जिल्हाधिकारी कार्यालया समोरील एका धावत्या कारवर अचानक झाड कोसळल्याची घटना घडली.

वाहनाचा चक्काचूर , सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालया समोरील एका धावत्या कारवर अचानक झाड कोसळल्याची घटना भर दुपारी घडली. यात वाहनाचा चक्काचूर झाला असला, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाहनचालक चंद्रकांत देसाई (वय 62, रा.उचगाव, ता. करवीर) हे जखमी झाले आहेत. पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागाळा पार्क परिसरात जिल्हाधिकारी, उद्योग भवन आदी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. जवळच जिल्हा परिषदेसह शाळा-महाविद्यालये, महावीर गार्डन, दवाखाना असल्याने नेहमीच हा मार्ग वाहनांसह नागरिकांनी गजबजलेला असतो. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोल पंप या मार्गावर महावीर गार्डजवळ जुने मोठे झाड अचानक एका धावत्या आलिशान कारवर कोसळले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आसपासच्या नागरिकांसह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनातील चालक व जखमी चंद्रकांत देसाई यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. नेहमी गजबजलेल्या या रस्त्यावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे वाहतूक दोन तास खोळंबली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड तोडून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Post a Comment

Previous Post Next Post