इचलकरंजी : इनपा तर्फे 36 गुंठ्यामध्ये अतिशय भव्य सुंदर व चांगले ऑक्सीजन पार्क उभारण्यात आले



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इचलकरंजी :  कृष्णा नगर परिसर गट क्र.386 येथे इनपा  तर्फे 36 गुंठ्यामध्ये अतिशय भव्य सुंदर व चांगले ऑक्सीजन पार्क उभारन्यात आले आहे. यामुळे नगरपालिकेचे कौतुक आहे. या पार्कच्या बाजूने लोखंडी जाळी आहे. चार ठिकाणी जाळी तोडण्यात आलेली आहे. त्या तुटलेल्या जाळ्या  मधून दिवसा व रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे व्यक्ती त्या ठिकाणी कायमपणे आत बाहेर करत असल्यामुळे अनेक झाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऑक्सीजन पार्क मधील सर्व झाडे नष्ट होण्याचा धोका आहे. त्याच प्रमाणे त्या भागातील नागरिकांना त्याचा अतिशय त्रास होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी इचलकंजी नगरपालिकेने आपला कायमचा एक वाचमेन नेमण्यात यावा त्याच प्रमाणे गल्ली नंबर 1 मध्ये गटारीचे पाणी जवळजवळ दहा वर्षे झाले गटारातून निचरा होत नाही गटारी मध्ये साचून राहते गल्ली नंबर 2 मध्ये गटारीच करण्यात आलेली नाही आहे. ते पाणी समोरच्या मोकळ्या जागेत जाऊन त्यामध्ये जनावरांचा वावर होऊन ती जनावरे रस्त्यावर येऊन ती सर्व घाण सर्वांच्या दारात येत आहे. त्याचप्रमाणे रात्री डासांचा अतिशय प्रचंड फैलाव भागात आहे. 

रात्री सात नंतर घराच्या बाहेर बसने देखील होत नाही. भागातील नागरिकांना आरोग्यास प्रचंड धोका आहे .प्रत्येक घरी एक माणूस आजारी पडत आहेत . या भागाची अतिशय वाईट अवस्था आहे. तरी याबाबत उपाययोजना लवकरात लवकर राबवन्यात यावी तसे नाही झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्री फरीद मुजावर यांनी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी माननीय श्री संगेवार साहेब यांना निवेदन द्वारे दिला. या  चंद्रकांत नवले ,इमरान हवेरी, रफिक जमादार ,मोहम्मद मकानदार , जुबेर शेख ,इक्बाल शेख, सुकुमार साखरे, विजय पडियार ,शाबाज मदारशा ,अल्लाबक्ष लखमेश्वर, मोसिन जमना, वजीर मोमीन ,निहाल शेख , महिला मध्ये मुमताज मुजावर ,शायरा जमना, यास्मिन मुल्ला ,सिमरन मुजावर, बिस्मिल्ला जमादार ,नजमा मोमीन,  कौसर लखमेश्वर, बेबी आलासे, शमशाद मुजावर व भागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post