1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे अभिवादनासाठी

  मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनाही मनाई करण्यात आली.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : अंजुम इनामदार हे मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष म्हणून काम करतात. ते त्यांच्या मुस्लिम संघटनेचा कार्यकर्तासह सक्रिय आहेत. ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह मौजे सणसवाडी. वडु बुद्रुक व कोरेगाव-भीमा गावाच्या हद्दीत रोजी येऊन विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमांमध्ये CAA, व NRC च्या विरोधात तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, पत्रक वाटपाच्या माध्यमातून वादग्रस्त विधान, आक्षेपार्ह वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. यातील जाब देणार हे त्यांच्या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांना संघटित करून आगामी 1 जानेवारी 2022 रोजी च्या कार्यक्रमाचे अनुषंगाने समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

........................................

*कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात CAA, NRC विरोधी पत्रक वाटणे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे असे कोणताच छुपा अजेंडा आमच्या संघटनेचा नाही.*

*खोटी माहितीच्या आधारावर पाठविण्यात आलेला पत्र असण्याची शक्यता आहे असो.*

........................................

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. भरत पाटणकर, डॉ. सुरेश खैरनार, सत्यशोधक किशोर ढमाले यांनी भीमा कोरेगाव दंगली वर फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट तयार केली.

रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे की या 200 वर्षानिमित्ताने कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसापासून काहीतरी खिचडी आतल्याआत शिजत आहे. अशी कुजबूज परिसरातील अनेक लोकांनी व्यक्त केली होती. भीमा कोरेगाव व परिसरातील सर्व हॉटेल चहापाणी नाश्ता व किराणा दुकाने 1 जानेवारी रोजी बंद ठेवावे असे आवाहन करणारी टोळी फिरत होती. मंगल कार्यालयात असलेल्या पाणी सुद्धा फेकून देण्यासाठी आव्हान करत होती. राज्य सरकारने नेमलेल्या जे. एन. पटेल कमिशन समोर सदरची रिपोर्ट या मान्यवरांनी सादर ही केली आहे. 

वर्तमान महाराष्ट्र सरकार योग्यरीत्या चांगल्या पद्धतीने दंगलीची चौकशी स्वतः लक्ष घालून करीत असताना अचानक पणे दिल्ली सरकारने हे केस नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीला का वर्ग केला असे अनेक प्रश्न आजही देशातील जनतेला कळाले नाही.

योग्य वेळी दखल घेतली असती तर ही दंगल झालीच नसती. 


ही कहावत खूप जुनी आहे म्हणतात ना


*मूंछ वालो को छोड़ो दाढ़ी वालो को पकड़ो*


Post a Comment

Previous Post Next Post