थर्टी फर्स्ट निमित्त शुक्रवारी शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार

नियम पाळणाऱ्याना किचेन व शाबासकी, तर मोडणाऱ्याना शपथेचे रिस्ट बॅण्ड आणि दंड 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबर वाहतुकीचे नियम नागरिकांनी पाळावे यासाठी वाहतूक पोलीस जरा हटक्या स्वरूपात कारवाई करणार आहेत. नियम पाळणाऱ्याना किचेन व शाबासकी, तर मोडणाऱ्याना शपथेचे रिस्ट बॅण्ड आणि दंड ठोठावण्यात येणार आहे.थर्टी फर्स्ट निमित्त शुक्रवारी शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबरोबरच वाहतुकीचे नियमदेखील पाळले जावे यासाठी पोलीस सर्वत्र वॉच ठेवणार आहेत. असे असतानाच पश्चिम विभागात वाहतूक पोलीस जरा हटके स्वरूपात कारवाया करणार आहेत. नियमांचे पालन करणाऱयांना वाहतूक विभागाचे चिन्ह असलेले किचेन भेट म्हणून देणार आहेत, तर नियम धाब्यावर बसवणाऱया बेजबाबदार चालकांवर दंडात्मक कारवाईबरोबर त्यांच्या हातावर रिस्टबॅण्ड लावण्यात येणार आहेत. जो नियम मोडला जाईल तो नियम पुन्हा मोडणार नाही अशा शपथेचा तो रिस्टबॅण्ड असणार आहे. याव्यतिरिक्त दारूच्या बाटलीची वेशभूषा केलेला उंच व्यक्ती ठिकठिकाणी उभा असेल आणि त्यावर दारू पिऊन गाडी चालवणार नाही असा संदेश लिहिलेला असेल. ज्या चालकांना त्याच्यासोबत सेल्फी घ्यायची असेल त्यांना ती घेता येईल, असे उपायुक्त नितीन पवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post