मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन कर्नाटक गाड्या जाणाऱ्या फोडल्या.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मिरज : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली.या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकां मध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत.आज, सकाळी मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन कर्नाटक गाड्या जाणाऱ्या फोडल्या. या परिसरात असलेल्या हॉस्पिटल वरील कर्नाटक अक्षारतील बोर्ड ही शिवसैनिकांनी दगड मारून फाडले.
या प्रकरणी मिरज गांधी चौकी पोलिसांनी चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, महादेव हूलवान, अतुल रसाळ, पप्पू शिंदे, गजानन मोरे, दिलीप नाईक, प्रकाश जाधव, किरण कांबळे, यांना घटनास्थळवरून ताब्यात घेतले. कर्नाटक मधून आलेल्या तीन गाड्या शिवसैनिकांनी फोडल्या. त्यापैकी दोन गाड्या गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या.
Tags
मिरज