क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उड्डाणपुलाचे काम 1 जानेवारी पासून सुरू करण्यात येणार.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

पुणे :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उड्डाणपुलाचे काम 1 जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील दहा दिवसांत महापालिकेकडून कामात अडथळा ठरणाऱ्या सेवावाहिन्या हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डीपीनुसार हा रस्ता विद्यापीठ सर्कल ते सेनापती बापट रस्त्याच्या सुरुवातीपर्यंत 45 मीटर रुंद केला जाणार आहे.या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत बैठक पार पडली. यात हे निर्णय घेण्यात आले.

'पीएमआरडीए' आयुक्त सुहास दिवसे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह पालिकेच्या भूसंपादन, पथ, ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

'पीएमआरडीए'कडून हा बहुमजली पूल उभारला जाणार आहे. त्यातच हा विद्यापीठ चौक शहराच्या पश्चिम भागातील औंध, बाणेर, बालेवाडी या भागांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा चौक आहे. या चौकात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा मार्ग असल्याने या ठिकाणी बहुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे.

मात्र, हे काम सुरू केल्यानंतर गणेशखिंड रस्ता, तसेच औंध, बाणेर, पाषाण रस्ता परिसरात वाहतूककोंडी होणार आहे. त्यामुळे महापालिकेने डीपीतील आखणी नुसार हा रस्ता 45 मीटर रुंद करून घ्यावा अशी मागणी पीएमआरडीए कडे केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post