क्राईम न्यूज : रायगड जिल्ह्यात अडीच लाखाचे गांजा जप्त

 रायगड पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे , रायगड वरिष्ठ पोलीस क्राईम ब्रांच श्री दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

         रायगड पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

अलिबाग गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री राजेश पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पेन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 किलो गांजा जप्त करण्यात आला पेण येथील आरोपीला अटक.

रायगड जिल्ह्यात मादक द्रव्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या घटना घडत असतात. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पेण येथून अडीच लाखाचा 20 किलो गांजा हस्तगत केला आहे. या गांजा प्रकरणी पेणमधील जोशी चाळ फणस डोंगरी येथून सुशील राजाराम पाटील वय 35 वर्ष यास अटक करण्यात आली आहे. पेण पोलीस ठाणे गु.र.न. 261/2021, NDPS ACT कलम 8(क ), 20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून नववर्षाच्या अनुषंगाने 30 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पेण परिसरात पेट्रोलिंग सुरू होते. यादरम्यान पोह राजेश पाटील यांना पेन शहरातील गणेश मंदिराचे समोरील बिल्डिंगचे मागे मोकळ्या जागेत, फणस डोंगरी, येथे एक इसम गांजा घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तीला ताब्यात  घेतले. सुशील पाटील असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याची तपासणी केली असता बॅगेत 20 किलो 740 ग्राम मादक नशाकारक गांजा सापडला.

याची किंमत 2 लाख 49 हजार रुपये आहे. सुशील यास अटक केली असून पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार ठाकूर, पोह राजेश पाटील, पोह झेमसे, पोह मोरे, पोह हंबीर, पोह सावंत, पोह चव्हाण, पोना म्हात्रे, पोशि लांबोटे या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

Previous Post Next Post