मुंबईत पार्ट्यांची बत्ती गुल कोकण किनारा फुल एक्सप्रेस वे जाम.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

मुंबई शुक्रवारी रात्रीपासून च नाताळ आणि न्यू इयर पार्ट्यांवर महापालिकेने बंदी आणली त्यामुळे मुंबई ठाणेकरांनी थेट कोकणचा रस्ता धरला आहे शनिवारचा रविवारचा वीपेड नाताळची सुट्टी आणि मस्त गुलाबी थंडी अशी पर्वणी साधून मुंबई ठाणेकरांनी थेट पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पर्यटन स्थळे व देवस्थानाच्या दर्शनासाठी पुच केले

त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान ट्रफिक जाम झाले होते. खालापूर टोलनाका ते बोरघाटातील अमृतांजन ब्रीज या मार्गावर बारा तास गाडय़ा मुंग्यांच्या पावलाने चालल्या होत्या. बोरघाट, खालापूर पोलीस आणि वाहतूक शाखेने अथक प्रयत्न केल्यानंतर दुपारी वाहतूक सुरळीत झाली खरी परंतु रविवारीही या मार्गावर हीच परिस्थिती निर्माण होऊन हजारो गाडय़ा ट्रफिक जाममध्ये अडपून पडण्याची शक्यता आहे.

शनिवार-रविवार आणि वर्षअखेरचे पाच दिवस असे सात दिवसांच्या सुट्टय़ांचे प्लॅनिंग करून मुंबई-ठाणेकर कार, लक्झरी, ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाडय़ांनी शुक्रवारी रात्रीच निघाले. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थाने कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी तर कोकणवासी आंबोली घाट व गगनबावडा घाटातून कोकणात उतरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांमुळे एक्प्रेस वेवर प्रचंड वाहतूककाsंडी झाली. पुणे लेनवर बोरघाट पोलीस चौकी, दस्तुरी, अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्यादरम्यान तर मुंबई लेनकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करताना बोरघाट (दस्तुरी) खंडाळा टॅपच्या वाहतूक पोलिसांना अक्षरशः नाकीनऊ आले.

नो एण्ट्रीत घुसणाऱ्या गाडय़ांचाही फटका

बोरघाटातून खंडाळ्याकडे जाण्यासाठी काही वाहनचालक नो एण्ट्रीतून घुसत असल्याने त्याचाही फटका बसून वाहतूककाsंडीत भर पडली. या वाहतूककाsंडीचे टोक खोपोलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post