तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे अनेक ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी पोलीस तैनात.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख :

आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे वाहतूक कोंडी ही  गंभीर समस्या आहे. त्यातच लग्नाची तिथी असली म्हणजे वाहतूक कोंडीत आणखी भर,  दरम्यान, रविवारी (दि. 26) लग्नाची मोठी तिथी असून वाहतूककोंडी होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी पोलीस तैनात करण्यात आले असल्याने रविवारी वाहतूक कोंडीचा समस्या जादा जाणवणार नाही, असा आशावाद वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल रिकोबे यांनी व्यक्‍त केला आहे.आळंदीमध्ये जवळजवळ 600 ते 800 मंगल कार्यालये असल्याने येथे माऊलींच्या दर्शनाला गर्दी कमी व लग्ने जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या लग्नाच्या आळंदीत आता वऱ्हाडी मंडळींची जणू जत्राच भरू लागली आहे.

अशी परिस्थिती निर्माण झाल्याने येथील वाहतूक कोंडीवर मोठा ताण पडत आहे. शिवाय आळंदी शहरात कोणत्याच रस्त्यावर नो पार्किंग, नो व्हेईकल झोन असे फलक नसल्याने वाहन चालक हव्या त्या ठिकाणी वाहने उभी करतात त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडले.

दरम्यान, आळंदीतील वाहतूककोंडी वारंवार का होते? ती का सुटत नाही ? याची अनेक कारणे रिकोबे यांनी दिली आहेत. नगरपालिकेने शहरामध्ये प्रदक्षिणामार्ग, वडगाव रोड, चाकण रोड, देहू फाटा, मरकळ रोड आदी ठिकाणी नो पार्किंगचे फलक नगरपालिकेने लावावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.या साठी आळंदी नगरपालिकेचे उपाध्यक्ष आदित्यराजे घुंडरे पाटील हे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांची भेट घेऊन वाहतुकी संदर्भात बैठकीचे आयोजन करून पोलीस प्रशासनास निवेदन देऊन परवानगी घेणार आहेत. तसेच आदित्यराजे घुंडरे स्वखर्चातून शहरांमध्ये लावल्या जाणाऱ्या नो पार्किंग फलकांचा खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post