अशा गाड्या जप्त करण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

जिलानी (मुन्ना ) शेख :

 पुणे - शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि महिनों महिने पडून असलेली तसेच पार्किंग केलेल्या वाहनांमुळे शहर स्वच्छता करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.तसेच, ही वाहने वाहतुकीसही अडथळा ठरत आहेत. अशी वाहने जप्त करण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार असून त्याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.

शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने पडून आहेत. तसेच अनेक नागरिक आठवडा आठवडा रस्त्यावरच वाहने पार्क करत आहेत. ही वाहने वाहतुकीस अडथळा ठरत आहेतच शिवाय, या वाहनाच्या खाली कचऱ्याचे ढीग साचत असल्याने गाडी खालच्या भागात स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कचरा कुंड्या तयार होत आहेत. त्याचा परिणाम शहर स्वच्छते वर होत आहे. त्यामुळे अशा गाड्या जप्त करण्याची मोहीम महापालिकेकडून सोमवार पासून हाती घेण्यात येणार आहे.

…अशी होणार कारवाई

अशा रस्त्यांवर असलेल्या वाहनांना महापालिकेकडून नंबरच्या माहितीच्या आधारे नोटीस बजाविण्यात येणार आहे. याशिवाय, सात दिवसांत गाडी काढून घेण्याची नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतरही या गाड्या न काढल्यास पालिकेकडून त्या जप्त केल्या जातील. त्यानंतर जे मालक गाडी घेण्यासाठी येतील त्यांना गाडी उचलण्याचा खर्च तसेच गाडीमुळे रस्त्यावर झालेल्या कचऱ्याचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच त्यांची गाडी सोडली जाईल. तर ज्या गाड्या भंगार म्हणून रस्त्याच्या कडेला पडलेल्या आहेत. त्यांचे क्रमांक तसेच इतर माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देऊन या गाड्या त्यांच्या ताब्यात दिल्या जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post