नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी कला-गुणांना वाव देणारे उपक्रम

कौतुकास्पद आहे .....भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

जिलानी (मुन्ना) शेख.

 पुणे : प्रभागातील विकास कामांना प्राधान्य देण्याबरोबरच महिलांना तसेच मुलांना सण-समारंभाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यातील कला-गुणांना वाव देणारे उपक्रम नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी घेतले.या उपक्रमात सहभागी झालेल्यांना बक्षीस देऊन कौतुकही केले हे काम कौतुकास्पद आहे. असे मत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती व नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त अटल सप्ताह अंतर्गत गौरीगणपती व किल्ले स्पर्धा यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी त्या बोलत होत्या.

टॉप मीडिया हाऊसचे माय टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन गौरी गणपती सजावट स्पर्धा 2021 या घेण्यात आल्या होत्या. किल्ले स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ चित्रा वाघ यांच्या हस्ते हडपसर गांधी चौक येथे पार पडला. सहभागी स्पर्धकांना प्रथम क्रमांकाचे फ्रीज ,द्वितीय क्रमांकाचे टीव्ही , व तृतीय क्रमांकाचे बक्षीस पीठाची गिरण ,चतुर्थ बक्षीस मिक्सर व इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ ,असे बक्षीस वितरण करण्यात आले .

याप्रसंगी नगरसेवक मारुती आबा तुपे, जीवन जाधव ,अमित गायकवाड संकेत झेंडे, दिलीप तुपे, सतीश भिसे, नागेश जगताप, ओंकार तुपे, गोरख तुपे तसेच मारुती आबा युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान, रुद्रतेज प्रतिष्ठान ,आधार प्रतिष्ठान मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post