कफ सिरपच्या दुष्परिणामामुळे दिल्लीतील तीन लहान मुलांचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

या सिरपवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

खोकला असेल तर कप सिरप देण्याची आपली नेहमीची पद्धत आहे अनेकदा अशा कप सिरप च्या बाटल्या घरी आणून ठेवल्या जातात आणि कुणाला खोकला किंवा कप झाला की चला डॉक्टरांचा सल्ला न घेताच दिला जात आहे

परंतू हे औषध काही वेळेस जीवावर बेतण्याचीही शक्यता असते.कफ सिरपच्या दुष्परिणामामुळे दिल्लीतील तीन लहान मुलांचा मृ्त्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिकमध्ये १६ मुलांना हे कफसिरप दिले गेले. त्यानंतर या सर्वांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना कलावती सरन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान यातील ३ जणांना मृत्यू झाला. यानंतर सेंन्ट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंन्ट्रोल ऑर्गनायझेशनने सिरपची तपासणी केली. यामध्ये हे सिरप अतिशय खालच्या दर्जाचे असल्याचे आढळले. यामुळे या सिरपवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामुळे कफ सिरप देताना dextromethophan या कफसिरपचा वापर पालकांनी थांबवावा. डॉक्टरांनीही हे कफसिरप देऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.या औषधाचे दुष्परिणाम यापुर्वीदेखील पुढे आले होते, परंतू यामुळे एवढी मोठी दुर्घटना पहिल्यांदाच घडली आहे

Post a Comment

Previous Post Next Post