देहू नगरपंचायतीचे कामकाज अधिकारी व कर्मचारी व्यस्त...

नागरिकांना त्यांची कामे करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

अनवरअली शेख :

 पिंपरी -देहू नगरपंचायत निवडणुकीसाठी आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. त्याचा तहसील कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे.कार्यालयातील ऑनलाइन कामे वगळता अन्य कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.

आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयातील तहसीलदार गीता गायकवाड यांना देहू नगरपंचायतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले यांची अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याशिवाय, कार्यालयातील 2 कारकून, 5 लिपिक यांची नेमणूक निवडणूक कामकाजासाठी करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात सध्या 2 लिपिक आणि 1 शिपाई कामावर हजर आहेत. 22 तारखेला देहू नगरपंचायतीसाठी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी पूर्ववत तहसील कार्यालयात कामासाठी हजर होतील.

तहसील कार्यालयामार्फत विविध ऑनलाइन दाखले मंजूर केले जातात. त्याशिवाय, जमिनीविषयक कागदपत्रे व अन्य तहसील कार्यालयाशी संबंधित विविध कामे केली जातात. मात्र, सध्या तहसील कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी देहू नगरपंचायतीचे कामकाज करीत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम तहसील कार्यालयातील कामकाजावर होत आहे. नागरिकांना त्यांची कामे करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post