बंगळूर (कर्नाटक) घटनेचे पडसाद कोल्हापूरात

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : बंगळूर (कर्नाटक) मध्ये  समाज कंटकांकडून सदाशिव नगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुळ्याची विटंबना करुन व्हीडिओ व्हायरल केला आहे. याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले.कोल्हापुरात हर्षल सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्तांनी रात्री शहरातील कर्नाटकी मालकांची हॉटेल बंद पाडली. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत कर्नाटक मधील भाजप सरकारचा निषेध केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घातला.

काही दिवसापूर्वी लाल-पिवळ्याची होळी केली, म्हणून भगवाच्या बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्या समाजकंटकांकडून व्हायरल व्हिडिओमधून सांगण्यात आले आहे. बंगळूरू येथे सदाशिवनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा आहे. गुरुवारी रात्री काही समाजकंटकांनी या पुतळ्याची विटंबना केली. विटंबना करतानाचा व्हिडिओही जाणीव पूर्वक व्हायरल केला आहे. त्यामुळे बंगरूळसह कोल्हापूर जिल्ह्यातही रात्री याचे पडसाद उमटले आहेत.समाजकंटकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत दुकाने उघडायची नाही, असा इशारा दिला आहे

शिवभक्तांनी कोल्हापूरसह परिसरातील कानडी लोकांची दुकाने बंद पाडून जोपर्यंत "त्या' समाजकंटकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत दुकाने उघडायची नाही, असा इशारा दिला आहे. लक्ष्मीपुरी, कळंबा, राजारामपुरी, मंगळवारपेठ सह शहराबाहेरील उपनगरातील हॉटेल बंद पाडली. छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. तत्पूर्वी, कर्नाटक शासनाने त्या समाकंठकावर  तात्काळ कारवाई केली पाहिजे. अशी मागणी सुर्वे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post