रंकाळा तलावाचा विकास व सुशोभिकरणाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासन उचलणार..

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : रंकाळा तलावाचा विकास व सुशोभिकरणाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासन उचलणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.


ते म्हणले, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या परिपूर्ण विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी ९ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला. प्रकल्प खर्चासाठी शासन व महापालिका यांचा ७५ : २५ अशा हिश्‍याची अशी अट घालण्यात आली. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता २५ टक्के हिश्‍याचा खर्च महापालिकेच्या आवाक्याबाहेर आहे. निधी परत जाऊ नये व त्यासाठी सुशोभिकरण रेंगाळू नये यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. एखाद्या तलावासाठी शंभर टक्के खर्च उचलावा ही काही सोपी बाब नाही.

९ कोटी ८४ लाखांच्या निधीचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाने द्यावा, अशी मागणी मंत्री शिंदे यांच्याकडे केली. त्यास यश आले ही बाब निश्‍चितपणे आनंदीदायी आहे.आपल्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाल्याचे क्षीरसागर यांनी यावेळी नमूद केले.

दुसऱ्या टप्प्यातील ५ कोटींचा निधीही तात्काळ मंजूर करून त्यातही १०० टक्के हिस्सा राज्य शासनाकडून देण्याकरिता पुढील काळात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका हद्दीत मूलभूत सुविधांचा विकास या बाबीतंर्गत निधी मंजूर झाला आहे. ७५ः२५ असा असा हिस्सा रद्द करून शंभर टक्के हिश्‍याचे शुद्धीपत्रक नगरविकास विभागाने काल काढले. मंत्री शिंदे यांनी शहरातील मूलभूत सुविधांसाठी पंधरा कोटींचा निधी दिला आहे. नंतर रंकाळा तलावाच्या सुशोभिकरणाचा खर्च उचलला आहे.

यावेळी उत्तरचे शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, दीपक गौड, माजी नगरसेवक राजू हुंबे, अभिषेक देवणे, कमलाकर किलकीले, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, हर्षल सुर्वे, अंकुश निपाणीकर, रियाज बागवान आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post