दत्तवाड मध्ये पिक अप शेडची दुरवस्था

 प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे

प्रेस मीडिया वृत्तसेवा :  प्रतिनिधी :.

दत्तवाड:- तालुका शिरोळ येथे प्रवाशांच्या सोईसाठी उभारण्यात आलेल्या पिकअप शेड ची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे


  दत्तवाड ही एक मोठी बाजारपेठ असून कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात लोक या गावांमध्ये खरेदी करण्यासाठी येत असतात त्याच बरोबर दत्तवाड या गावा वरून इचलकरंजी व कुरुंदवाड एसटी महामंडळाची वाहतूक होत असते या ठिकाणी एसटी वडाप इत्यादी प्रवासी वाहनांची वाट बघत प्रवासी उभी असतात त्यामुळे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन येथे पिकप शेडची उभारणी जी करण्यात आली आहे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या पिकप शेड वरील नावाचे बोर्ड देखील नाही यामुळे प्रवाशांना गावाचे नाव समजण्यास अडचण येत आहे पिकअप शेड मध्ये काही व्यसनि लोकानी तंबाखू पान खाऊन पिकअप शेड च्या भिंती रंगवली आहेत तसेच पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रवाशांना झाडाखाली राहून प्रवासी वाहनांची वाट पहावी लागत आहे

 तरी संबंधित विभागाने या पिकप शेडची दुरुस्ती करावी अशी मागणी  प्रवाशांकडून होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post