आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत

 इचलकरंजी येथील धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकात तीव्र निषेध करण्यात आला.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

संपूर्ण भारताची अस्मिता व अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये केल्याची घटना (16 डिसेंबर) रात्री घडली. त्याचा आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी येथील धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी यावेळी केली. संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.

Post a Comment

Previous Post Next Post