देहू नगरपंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबरला

१० उमेदवारांनी घेतली निवडणुकीतून माघार ...

कॉंग्रेसच्या एका अधिकृत महिला उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने कॉंग्रेसला धक्का



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख 

 देहू : देहू नगरपंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबरला आहे. सोमवारी १० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे १३ प्रभागातून १३ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.त्यात कॉंग्रेसच्या एका अधिकृत महिला उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने कॉंग्रेसला धक्का बसला आहे.


देहू नगरपंचायतीची १७ पैकी १३ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार सोमवारी (ता.१३)माघार घेण्याची मुदत होती. नगरपंचायत निवडणुकीसाठी अपक्षासह विविध राजकीय पक्षाचे, असे एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात सर्वात जास्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या होती. त्यामुळे अपक्षांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मावळमधील नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली. निवडणुकीच्या रिंगणातून १० जणांनी माघार घेतली. प्रभाग क्रमांक १३ मधून कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार वनिता देशकर यांनी माघार घेतली. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माघारीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमधून तेरा प्रभागातून सरळ लढत आहे. तर काही प्रभागात शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यासह चौरंगी लढत आहे.

प्रभाग क्रमांक १ : मीना कुऱ्हाडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), सुनील शिंगाडे (कॉंग्रेस), नरेंद्र कोळी (भाजप), बाई केदारी (शिवसेना).

प्रभाग क्रमांक २ : रसिका स्वप्निल (राष्ट्रवादी कॉंग्रेस), कल्पना पिसाळ (कॉंग्रेस), शीतल मराठे (भाजप).

प्रभाग क्रमांक ३ : पूजा दिवटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), पूनम भालेराव (कॉंग्रेस), प्रतिक्षा जाधव (भाजप), शैला खंडागळे (शिवसेना), छाया घोलप (अपक्ष).

प्रभाग क्रमांक ४ : मयूर शिवशरण(राष्ट्रवादी कॉंग्रेस), प्रकाश कांबळे (कॉंग्रेस), प्रणव कसबे (भाजप), गौतम हाटाळे (शिवसेना), चंद्रकांत चव्हाण (अपक्ष).

प्रभाग क्रमांक ५ : अभिजित काळोखे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), तुकाराम काळोखे (भाजप), सचिन काळोखे(शिवसेना). प्रशांत काळोखे, शीतल हगवणे, सचिन काळोखे (तिघेही अपक्ष).

प्रभाग क्रमांक ६ : पुनम काळोखे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), योगिता काळोखे (भाजप).

प्रभाग क्रमांक ७ : विकास कंद (राष्ट्रवादी कॉंग्रेस), नितीन हगवणे (भाजप), योगेश काळोखे (अपक्ष), अमित घेनंद (अपक्ष).

प्रभाग क्रमांक ८ : रत्नमाला करंडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), केतकी कदम (कॉंग्रेस), पूजा काळोखे (भाजप), अक्षता कंद (शिवसेना).

प्रभाग क्रमांक ९ : स्मिता चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस), स्वाती चव्हाण (भाजप), मंगल लगाडे (शिवसेना).

प्रभाग क्रमांक १० : सुधीर काळोखे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), सुहास गोलांडे (भाजप), पुरुषोत्तम भालेकर(शिवसेना).

प्रभाग क्रमांक १३ : प्रियांका मोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), अनिता मुसुडगे (भाजप).

प्रभाग क्रमांक १६ : योगेश परंडवाल (राष्ट्रवादी कॉंग्रेस), प्रद्युम्न टिळेकर (भाजप), सचिन विधाटे (अपक्ष).

प्रभाग क्रमांक १७ : ज्योती गोविंद टिळेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), अरुणा परंडवाल (भाजप), ज्योती रोहिदास टिळेकर (शिवसेना), सुनीता टिळेकर (अपक्ष).

निवडणूक प्रक्रिया रद्द

प्रभाग क्रमांक ११, १२, १४, १५ हे ओबीसी आरक्षणासाठी राखीव होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

http://m.facebook.com.


Post a Comment

Previous Post Next Post