निगडी येथे हिंदी उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने

 "महफिले खुमार"चे आयोजन करण्यात आले. यात बहूभाषिक कविसंमेलन झाले.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : मोहम्मद शुक्रुऊल्लाहा :

 निगडी पुणे : कार्यक्रमाचे अध्यक्ष इकबाल खान म्हणाले, कौमी एकता टिकवून ठेवणे आणि वाढवणे हे शायराचे कर्तव्य आहे. लेखणी सदैव चालली पाहिजे. लेखणी विकता कामा नये. द्वेष संपवणे आणि प्रेम वाढवणे हे सगळ्याचे कर्तव्य आहे.

प्रमुख पाहुण्या रईसा खुमार हे नाशिक वरून खास आल्या होत्या. त्यांनी आपल्या बहारदार गझला सादर केल्या.

"जब तक न आयेगा वो हमारे दयार मे 

बैढे रहेंगे हम यूँ ही इंतज़ार मे"

अशा एका पेक्षा एक गझलांनी मैफिल सजली गझलेने मैफिल रंगली. या वेळी झिया बागपती, सविता इंगळे, अश्विनी कुलकर्णी, सलाम इनामदार, माधुरी ओक, चिंतामणी कुलकर्णी, आय. के. शेख, शुक्रूल्लाह खान अमीत पाटील इत्यादी मान्यवर हजर होते. सुत्रसंचालन राज अहेरराव यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदिप गांधलीकर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post