नियोजित दापोडी येथील ‘एसआरए’ प्रकल्प रद्द होणे म्हणजे नागरिकांच्या एकजुटीचा विजय : खासदार श्रीरंग आप्पा बारणे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड दापोडी : 

नागरिकांच्या एकजुटीचा विजय दापोडी येथील नियोजित ‘एसआरए’ प्रकल्प रद्द करण्याचा ठराव गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला .

हा प्रकल्प करण्यासाठी प्रशासन आणि मनपातील पदाधिकारी नागरीहिताकडे दुर्लक्ष करुन ठेकेदारांना फायदेशीर ठरतील, असे निर्णय घेताना दिसत होते. नियोजित ‘एसआरए’ प्रकल्प रद्द होणे म्हणजे नागरिकांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.या प्रकल्पातील बाधित होणा-या नागरिकांचे हित पाहणे मावळचा खासदार या नात्याने माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी ‘दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समिती’ च्या वतीने आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आणि हा प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करण्याचा ठराव संमत झाला असेही बारणे म्हणाले. खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीची शनिवारी १३ नोव्हेंबरला पत्रकार परिषद झाली आणि सोमवारी १५ नोव्हेंबरला महानगरपालिकेवर एल्गार महामोर्चा काढण्यात आला होता.

यानंतर गुरुवारी १८ नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाला स्थगिती मिळाल्यानंतर आनंदाप्रित्यर्थ रहिवाशांनी दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीचे समन्वयक राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली दापोडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आनंदोत्सव साजरा करीत पेढे वाटले.

यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, माजी नगरसेवक सनी ओव्हाळ, रमा ओव्हाळ, गोपाळ मोरे,सुरेश कांबळे, संजय भिंगारदिवे, जन्नत सैय्यद, मनोज उप्पार, वामन कांबळे,  विनय शिंदे,श्रीमंत शिंदे,  कमलेश पिल्ले, ज्ञानेश्वर वायकर, दिलीप निकाळजे, सुरेखा जोशी, सिंकदर सूर्यवंशी, अजय ठोंबरे, इमाम शेख, जाकीर शेख, सुप्रिया काटे, सुखदेव सोनवणे, नवनाथ डांगे, बाळासो जगदाळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


*जाहिरात वबातम्यांसाठी संपर्क; अन्वरअलीशेख       9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post