स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये इचलकरंजी शहराची देशात ७६ तर राज्यात दुसऱ्या स्थानावर झेप




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी : स्वच्छ भारत मिशनतर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या अभियानामध्ये इचलकरंजी शहराने उत्तम कामगिरी करून देश पातळीवर ७६ वा क्रमांक (३७२ पैकी) तर राज्य पातळीवर दुसऱ्या क्रमांक (१३ पैकी) पटकविला आहे. मागील स्पर्ध्यमध्ये इचलकरंजी शहर देशपातळीवर ८९ व्या क्रमांकावर तर राज्य पातळीवर तत्कालीन रॅकिंग नुसार २५ व्या क्रमांकावर होते. इचलकरंजी शहर हे १ ते १० लाख लोकसंख्याच्ये गटामध्ये गणले जाते. स्वच्छतेच्या या स्पर्धेमध्ये शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, नागरिकांचे स्वच्छतेच्या बाबतीत जनजगरण व सहभाग अशा विविध क्षेत्रातील कामांचे परीक्षण करण्यात आले. हे परीक्षण केंद्र शासनकृत त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आले. दरम्यान इचलकरंजी शहरास ओपन डेफिकेशन फ्री प्लस प्लस (ODF++) प्रमाणित करण्यात आल्यामुळे शहराचे एकूण रॅकिंगवर चांगला परिणाम झाला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण मधील या कामगिरीसाठी शहरच्या नगराध्यक्षा मा. ॲड सौ. अलका स्वामी, उप-नगराध्यक्ष मा. श्री. तानाजी पावार, तत्कालीन मुख्याधिकारी मा. श्री. दीपक पाटील, श्री. संतोष खांडेकर, श्री. शरद पाटील, विद्यमान मुख्याधिकारी मा. श्री. डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य अधिकारी श्री. डॉ. सुनीलदत्त संगेवार, उप मुख्य अधिकारी श्री. केतन गुजर, तत्कालीन आरोग्य सभापति सौ. गीता भोसले, विद्यमान आरोग्य सभापति श्री. संजय केंगार, शहर स्वच्छता विभाग प्रमुख श्री. विश्वास हेगडे, स्वच्छ सर्वेक्षणचे शहर समन्वयक अधिकारी श्री प्रविण बोंगाळे, तत्कालीन मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. विजय पाटील व मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. सूर्यकांत चव्हाण, सर्व स्वच्छता निरीक्षक, सर्व प्रभाग निरीक्षक व आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचारी, सर्व विभाग प्रमुख, सर्व नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांचे विशेष* *योगदान व मार्गदर्शन लाभले असून पुढील स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये याहून उत्तम कामगिरी करण्याचा मानस आहे.

शहर समन्वयक इचलकरंजी नगरपरिषद.

Post a Comment

Previous Post Next Post