ब्रेकिंग न्यूज : प्रेस मीडियाच्या बातमीचा परिणाम...

          बातमी देण्यापूर्वी...बातमी दिल्यानंतर...

 पुणे विद्यापीठातील शुटींग बंद... 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे : पुणे विद्यापीठात गेले दोन दिवस चालू असलेल्या चित्रपट शूटिंगची बातमी प्रेस मीडियाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. त्याचा परिणाम म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चित्रपटाच्या शूटिंगचा सेट रात्रभरात गुंडाळण्यात आला .सध्या या विद्यापीठात कोठेही शूटिंग चालु नाही. विद्यापीठातील विद्यार्थी ,कर्मचारी, पालक यांनी सुटकेचा श्वास सोडला. हा परिसर नेहमीप्रमाणे रिकामा झाला असल्याने झाडे, परीक्षा  विभागाची इमारत, रस्ते यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे.

 या बाबत प्रेस मीडिया चे सर्वत्र कौतुक होत असून , प्रेस मीडिया चे पुणे जिल्हा प्रतिनिधी  अनवरअली शेख यांचे ही आभार मानले  आहे .

Post a Comment

Previous Post Next Post