कंगना राणावत व विक्रम गोखले यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राणावत व गोखले यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी चुकीचे वक्तव्य करून महान क्रांतीकारी शहिदांचे अपमान करणाऱ्या कंगना राणावतचे आणि बिंडोक पणे तिचे समर्थन करणा-या विक्रम गोखले यांचे चित्रपट पिंपरी चिंचवड शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे, शहराध्यक्ष कैलास कदम, पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे, युवकचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महापौर कविचंद भाट,  विजय ओव्हाळ, ज्ञानेश्वर मलशेट्टी, हिराचंद जाधव, आबा खराडे, के. एम. रॉय, के. हरी नारायण, इस्माईल संगम,  विश्वनाथ जगताप, नयन पांलाडे, रोहित तिकोणे, छायाताई देसले, पूजाताई बिबवे, कबीर मोहम्मद, हमीद इनामदार, बाबा बनसोडे, बाबा गायसमुद्रे, विशाल सरवदे आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post