सतेज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला .

 कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक सतेज पाटील आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात होणार..

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने सतेज पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक काँग्रेस उमेदवार सतेज पाटील आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली तरी अद्याप एकही अर्ज दाखल झाला नव्हता.


गुरुवारी सतेज पाटील यांनी पहिला अर्ज भरला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील आदी होते. याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रमुखही यावेळी एकत्र होते. त्यानंतर धैर्यशील हॉल येथे महाविकास आघाडीचा मेळावा होऊन सतेज पाटील यांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post