सांगली महानगरपालिका क्षेत्रात दिवाळी काळात 210 टन कचरा गोळा करण्यात आला.

आरोग्य कर्मचारी ऐन दिवाळीतही कार्यरत राहात रस्त्यावरील कचरा संकलित करत होते.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सांगली महानगरपालिका क्षेत्रात दिवाळी काळात 210 टन कचरा गोळा करण्यात आला. आरोग्य कर्मचारी ऐन दिवाळीतही कार्यरत राहात रस्त्यावरील कचरा संकलित करत होते. लक्ष्मी पूजनादिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्रपाळीत काम करीत कचरा उठाव केला आणि आपले शहर चकाचक केले सांगली महापालिका क्षेत्रात दिवाळीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवाळी काळात तिन्ही शहरे ही कचरामुक्त राहावीत, अशा सूचना आयुक्त कापडणीस यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या होत्या. या नुसार आरोग्य विभागाने दिवाळी काळात रस्त्यावर पडणारा कचरा संकलन करण्यासाठी विशेष नियोजन केले होते. या मध्ये आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील यांनी नियोजन केले.

दिवाळी काळातील कचरा उठावासाठी 10 वाहने, 50 कर्मचारी, 7 मुकादम, 4 स्वच्छता निरीक्षक, 1 वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांनी दिवसा व रात्रीच्या सत्रात तिन्ही शहरांतील कचरा उठाव केला. या संपूर्ण काळात सांगली शहरातून 120 टन, मिरजेतून 50 टन, तर कुपवाडमधून 40 टन असा एकूण 210 टन कचरा संकलित करण्यात आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आरोग्य कर्मचाऱयांनी रात्रपाळीत काम केले आणि आपली शहरे चकाचक केली. अजूनही व्यावसायिक दुकानांसमोर लावलेल्या नारळाच्या झावळ्या, केळीचे खुंट आणि हार संकलन करण्याचे काम सुरू असून, अंदाजे 50 टन कचरा गोळा होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post