आर्यन खानचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा डाव होता..

अपहरणाचे मोहित कंबोज हे मास्टरमाइंड असून खंडणीच्या खेळात कंबोज हे समीर वानखडेंचे साथीदार ....

राष्ट्रवादीचे प्रवत्ते नवाब मलिक ..



प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :


कॉर्डेलिया क्रुझ पार्टीला आर्यन स्वतः गेला नाही तर त्याला 2 ऑक्टोबर रोजी तिथे बोलावण्यात आले होते. आर्यन खानचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा डाव होता. या अपहरणाचे मोहित कंबोज हे मास्टरमाइंड असून खंडणीच्या खेळात कंबोज हे समीर वानखडेंचे साथीदार असल्याचा दावा करीत राष्ट्रवादीचे प्रवत्ते नवाब मलिक यांनी आज खळबळ उडवून दिलीक्रुझ पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एकामागून एक दावे करीत क्रुझ पार्टीचा बनाव रचण्यात आल्याची बाब समोर आणली. नवाब मलिक म्हणाले, ''प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रुझवर गेला. भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्या मेहुण्याच्या माध्यमातून हे जाळे टाकण्यात आले. तिथे आर्यन खानला पोहोचवले गेले. आर्यन खानचे अपहरण करून 25 कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील 18 कोटींमध्ये झाली. 50 लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने (के.पी. गोसावीच्या) खेळ बिघडवला.''

वानखेडेंचे नशीब चांगले सीसीटीव्ही बंद होता

समीर वानखेडेंनी आरोप केला की, कब्रस्तानमध्ये जाताना कोणीतरी माझा पाठलाग करत होते. माझ्या पत्रकार परिषदेनंतर 7 नोव्हेंबरला मोहीत कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तानच्या बाहेर भेटले होते. तिथल्या रहिवाशांनी मला माहिती दिली की, एक गाडी आली होती आणि एक दाढीवाली व्यक्ती त्यांना भेटली. त्यांचे नशीब चांगले आहे की, सीसीटीव्ही बंद असल्याने फुटेज आम्हाला मिळाले नाही. वानखेडेंनी घाबरून तक्रार नोंद केली.

 तर उडता पंजाब नंतर ' उडता महाराष्ट्र असा खेळ झाला असता

'कॉर्डेलिया क्रुझवर पार्टीचे आयोजन करणारा ड्रग्ज पेडलर काशीफ खान याने मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनादेखील पार्टीचे आमंत्रण दिले होते. शेख यांनी पार्टीत सहभागी व्हावं, यासाठी तो सतत आग्रह करत होता. राज्यातील मंत्र्यांच्या मुलांना फसवून त्या पार्टीत नेण्याचा प्रयत्न करत होता. या काशीफ खानला एनसीबीने का पकडलं नाही? अस्लम शेख यांना तो तिथे का बोलवत होता? मंत्र्यांच्या मुलांना तो का ट्रप करत होता? ड्रग्जचा खेळ राज्य सरकार चालवतेय असे तर यांना दाखवायचे नव्हते ना?,' असा सवाल करतानाच 'अस्लम शेख यांना खूप आग्रह केला जात होता. ते स्वतः याबद्दल सांगतील. पण ते या पार्टीत गेले नाहीत. ते गेले असते तर उडता पंजाबनंतर 'उडता महाराष्ट्र' असा खेळ झाला असता,' असे नवाब मलिक म्हणाले.

फ्रॉड लोकांना वाचवू नका !

नवाब मलिक यांनी आपण रागजकीय लढा देत नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, अशा प्रकारच्या फ्रॉड लोकांना वाचवण्यासाठी पुढे येऊ नका. मोहित कंबोज, सुनील पाटील, मनीष भानुशाली, धवल भानुशालीला वाचवू नका. असे फ्रॉड लोक राजकीय पक्षांच्या मागे लपून चुकीच्या गोष्टी करतात. हजारो कोटींची खंडणी उकळत आहेत.

चांडाळचौकडीने विभागाचे नाव खराब केले

एनसीबीने मुंबईच्या झोनल ऑफिसातल्या चांडाळचौकडीवर लक्ष ठेवावे. समीर वानखेडे, व्ही.व्ही. सिंग, आशीष रंजन आणि वानखेडेचा ड्रायव्हर माने या चांडाळचौकडीने पूर्ण विभागाचे नाव खराब करून ठेवले आहे. राज्य सरकार आणि पेंद्र सरकार अशा दोन एसआयटी तयार झाल्या आहेत. यात अपहरण आणि खंडणीचा प्रकार सिद्ध झाला आहे. हळूहळू वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. या प्रकरणात गोसावी, भानुशाली, सुनील पाटील, प्रभाकर साईल, वानखेडे, व्ही.व्ही. सिंग यातलं कुणीही दोषी असेल तर त्याला शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी मलिक यांनी केली.

जोपर्यंत व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत हे संपणार नाही !

सत्य समोर येईल. जोपर्यंत या विषयाचा शेवट होत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, धमकावण्याचा प्रयत्न करू नका. हा काही दोन इंटरव्हलचा चित्रपट नाही. जोपर्यंत यातला व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत हे संपणार नाही. माझ्याविरुद्ध कुणाला काय करायचेय ते करून घ्यावे. कितीही खोटं बोललात तरी सत्यच जिंकणार असल्याचे मलिक म्हणाले.

सॅम नव्हे सॅनवील डिसोजा !

या प्रकरणात चर्चेत आलेला सॅम डिसोजा याचे खरे नाव सॅनवील डिसोजा असल्याचे सांगतानाच नवाब मलिक म्हणाले, 'सॅम डिसोजा कोण आहे याचीही तुम्ही थोडी माहिती घ्या. तो सॅम डिसोजा नसून सॅनवील डिसोजा आहे. वीड बेकरी केस झाली होती, ज्यात सचिन टोपे आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणाता पाचवा आरोपी सॅम डिसोजा आहे. त्याच्या गुगल पेमधून सचिन टोपेच्या पत्नीला पेमेंट झाल्याचे पुरावे आहेत. 23 जूनला सॅम डिसोजाला एनसीबीच्या कार्यालयात भेटण्याची नोटीसही दिली गेली होती.'

समीर वानखेडेंच्या वडिलांचा मलिकांविरोधात मानहानीचा दावा

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी महाराष्ट्राचे क@बिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. वानखेडे यांचे वकील अर्शद शेख म्हणाले की, मलिक यांनी वानखेडे कुटुंबावर फसवणुकीचा आरोप करत त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मलिक यांनी वानखेडे कुटुंबातील सदस्यांचे नाव, चारित्र्य आणि त्यांच्या प्रतिष्ठsला नुकसान पोहोचवणारे आरोप केले आहेत,' असे या दाव्यात म्हटले आहेत.

सुनील पाटील वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा सदस्य!

कॉर्डेलिया क्रुझवर टाकलेला छापा आणि त्यानंतरची कारवाई या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील नावाची व्यक्ती असल्याचा तसेच तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केला होता. यावर बोलताना मलिक म्हणाले, कंबोज यांनी नाव घेतलेली सुनील पाटील ही व्यक्ती समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीची सदस्य आहे. 6 नोव्हेंबरला माझ्या पत्रकार परिषदेनंतर सुनील पाटीलचा पह्न आला होता. मी तुम्हाला पत्रकार परिषदेसंदर्भात अधिक माहिती देऊ इच्छितो असे त्याने सांगितले. दुसऱया पत्रकार परिषदेनंतरदेखील त्याने पह्न केला. मी त्याला मुंबईत येऊन पोलिसांना सर्व सांगायला सांगितले. तो येणार होता, पण आला नाही. सुनील पाटीलला मी आयुष्यात कधी भेटलो नाही. तो राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता नाही. सुनील पाटीलचे अमित शाहांसोबतचे अनेक व्हिडीओ फिरत आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळचे पह्टो आहेत. मनीष भानुशालीचे पंतप्रधानांपासून सर्वांसोबत पह्टो आहेत. सुनील पाटीलदेखील फ्रॉड आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

शाहरुख खानला घाबरवले जातेय

पैसे दिल्यामुळे तुला आरोपी बनवू, अशी धमकी शाहरुख खानला देण्यात आली आहे. पीडित कधी आरोपी नसतो. शाहरुख खानला पहिल्या दिवसापासून घाबरवण्यात येत होते. जर नवाब मलिकांनी बोलणे बंद केले नाही तर तुझा मुलगा भरपूर वेळ आत राहील. पूजा ददलानीचे प्रकरण समोर आले आहे. मुलासाठी खंडणी दिली म्हणजे गुन्हेगार होत नाही. समोर यावे आणि सत्य सांगावे. सर्व पीडितांनी पुढे येऊन मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले.

आरोपांप्रकरणी हायकोर्टात जाणार - मोहित कंबोज

'नवाब मलिक यांनी ज्या हॉटेल व्यवसायाचा उल्लेख केला आहे तो माझा नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत. ते दुसऱयांचे व्यवसाय माझे असल्याचे सांगत आहेत. सुनील पाटीलसोबत बोलणे झाल्याचे त्यांनी मान्य केले. जसे जसे त्यांच्याबाबत खुलासे होत आहेत तसे ते खोटे आरोप करत आहेत. हे आरोप करुन ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी घाबरत नाही. त्यांनी आरोप केल्यानंतर महिनाभरापूर्वी त्याच्यावर मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. जेवढे ते आरोप लावत आहेत त्याच्याविरुद्ध मी हायकोर्टात जाणार आहे. त्यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूझाचे काय संबंध आहेत ते लोकांना सांगावेत. मलिक गोष्टी लपवत आहेत. या गोष्टीपासून लांब पळण्यासाठी एखाद्यावर वैयक्तिक आरोप ते करत आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले होते,' असे सांगत मोहित कंबोज यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.

कंबोज आणि वानखेडे साथीदार

मोहित कंबोज आणि वानखेडेंचे चांगले संबंध आहेत. ते मुंबईत 12 हॉटेल चालवत असून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणण्यासाठी त्यांना बनावट प्रकरणांमध्ये अडकवतात. या शहरामध्ये ड्रग्जचा व्यवसाय सुरू राहावा हा समीर वानखेडेंचा प्रयत्न आहे. ड्रग्ज माफियांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून वसुली करण्यात येते. ड्रग्ज घेणाऱया सिनेकलाकारांची माहिती घेऊन त्यांना घाबरवायचे आणि त्यांच्याकडून वसुली करण्याचे काम समीर वानखेडे करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

वानखेडे यांनी शहराला ' पाताळलोक बनवलेय

समीर वानखडे यांनी या शहराला पाताळलोक बनवून ठेवलेय. कुणी म्हणेल, नवाब मलिक एनसीबीशी, भाजपाशी लढतोय. मी त्यांच्याशी लढत नाही. मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढतोय. या शहरात ड्रग्जच्या नावाखाली हजारो कोटींचा धंदा होत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. मी काही राजकीय लढा देत नाही, पण ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त व्हायला हवे. मोठे मासे पकडले जावेत असे मला वाटते, असेही मलिक म्हणाले.

एनसीबीची एसआयटी ऍक्शन मोडमध्ये

उपमहासंचालक संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या एसआयटीने आता तपास हाती घेतला असून संबंधित आरोपींना समन्स बजावणे सुरू केले आहे. एसआयटीने आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट व अचितकुमार यांची आज चौकशी केली तर आर्यनलाही बोलावलं होतं मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्याने वेळ मागून घेतली. तो सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. एसआयटी आर्यन खान, समीर खान प्रकरणांसह इतर चार प्रकरणांचा तपास करणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post