सावध रहा.... आज या भागात विजे सह पाऊस लावणार हजेरी.

  


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.

महाराष्ट्राच्या किनार्‍यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्र  पावसाने हजेरी लावली आहे आज दिनांक 19 रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजां सह पावसाची शक्यता आहे तर विदर्भासह उर्वरित भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहे. कमाल तापमानाचा पारा 29 ते 34 अंशांच्या दरम्यान असून कोकणात उन्हाचा ताप अधिक आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी 34.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

सोलापूरात पावसाची जोरदार बॅटिंग

सोलापूर शहरात रात्री उशिरा अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. मागच्या चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होत,

मात्र, काल पावसाने तुफान हजेरी लावत चार दिवसांची कसर भरून काढली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याच चित्र दिसून आल. यामुळे पुन्हा रस्ते आणि पाणी तुंबण्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

'या' भागाला यलो अलर्ट

दरम्यान कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या भागाला हवामान खात्याकडून देण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post