जसखार युवा सेनेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांनी घेतली मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.

शिवसेनेच्या जसखार शाखेच्या युवासेनेच्या पदाधिकारी  निवड नुकतीच जाहीर करण्यात आली, या मध्ये  शाखाअधिकारी म्हणून केतन म्हात्रे तर उपशाखाअधिकारी म्हणून समीर घरत यांची निवड करण्यात आली. 

या नवनियुक्त पदाधिकारी यांनी *शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले,  *माजी आमदार श्री.मनोहरशेठ भोईर* यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या वेळी उरण विधानसभा संपर्कप्रमुख  महादेव घरत, उपतालुका संघटक अमित भगत, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुका युवा अधिकारी निशांत घरत, जसखार शाखाप्रमुख राकेश तांडेल, ग्रा.पं. सदस्य परेश ठाकूर, वैद्यकीय क्षेत्र नवघर विभाग प्रमुख संदीप ठाकूर,  राकेश ठाकूर, अनिकेत ठाकूर, जगदीश ठाकूर, अतिश पाटील, सौरभ ठाकूर, मयूर कडू, शिवम ठाकूर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post