ओबीसी जागर अभियान रथ यात्रेचा रायगडात शुभारंभ

 


प्रेस मेडिया वृत्तसेवा.

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.

राज्यसरकारने जाणीवपुर्वक ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांचा निषेध करून या सरकारच्या झारीतील शुक्रचाऱ्याची भूमिका उघड करण्यासाठी आणि समस्त ओबीसी समाजाला जागृत करण्याकरिता भाजपच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर अभियान रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील ओबीसी जागर यात्रेला सुरुवात झाली आहे. 

          ओबीसी जागर अभियानाचे उदघाटन ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. मनोज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती कामोठे येथील भाजपा कार्यालय येथे शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले.  याप्रसंगी ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ओबीसी महिला आघाडी अध्यक्षा नगरसेविका सीता पाटील, भाजपा कामोठे मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे,अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, समाजसेवक आर.  जी.  म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, मंडल सरचिटणीस शरद जगताप, आध्यत्मिक आघाडी संयोजक विनोद खेडकर, मनीषा वनगे, जयश्री आचार्य, मनीषा पाटील, वनिता पाटील या पदाधिकाऱ्यांसह अनेक भाजपा ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

           राज्यातील सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे आज राजकिय आरक्षण गेले, उद्या शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण काढतील, त्यामुळे समाजात या संदर्भात जागर झाला पाहिजे आणि जो पर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नाही तो पर्यंत ही लढाई सुरूच राहील, अशी भूमिका या जागर यात्रेची आहे.

Post a Comment

Previous Post Next Post