एस.टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास माणुसकी फौंडेशनचा पाठींबा

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी...एसटी. महामंडळाचे कर्मचारी प्रवासांना चांगली सेवा देण्यासाठी  प्रयत्न करत असतात. एसटी ही अनेकांची वाहिनी आहे. अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना ने-आण करून विद्यार्थी घडवण्यामध्ये ही तिचा खूप मोठा हात आहे. त्याच सोबत काम करणाऱ्या लोकांना कामावर पोहचण्यासाठी ही एसटी मदत करीत असते. या एसटीने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अनेकांचे भविष्य घडविले आहे. पण आज त्यांच्या भविष्याचा प्रश्न समोर उभा राहीला आहे. महामंडळ राज्यशासनात विलगीकरणं करावे अश्या काही मागण्या घेऊन इचलकरंजी येथे ही एस. टीचे कर्मचारी बेमुदत संपास बसले आहेत. या संपाला माणुसकी फौंडेशनने पाठींबा दिला यावेळी बोलताना माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे म्हणाले ,की प्रत्येक एस. टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली. त्याचसोबत प्रथमेश इंदुलकर व कृष्णा इंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे, कृष्णा इंगळे, प्रथमेश इंदुलकर ,आनंद इंगवले, रंकित रॉय, ऋषीकेश सातपुते, रोहित भिऊनगडे, रवि लोहार, सागर पाटील, रोहन बुचटे, नागेश गजाकुंश, आक्रम मुजावर, अमर फातले, अभिजित शेटके, प्रविण कांबळे, श्री पोवार व इतर सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post