जागतिक क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे : टाईम हायर एज्युकेशन या संस्थेने वर्ष २०२१-२२चे शिक्षण संस्था ,विद्यापीठे यांची जागतिक क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्रमांक ८०० ते १००० च्या क्रमवारीत आला .वर्ष २०२०-२१ मध्ये हा क्रमांक ६०० ते ७०० च्या क्रमवारीत होता .तब्बल १०० क्रमांकाने क्रमवारीत ही घसरण झाली. नामांकित विद्यापीठ म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाची ही विद्यापीठाच्या स्थापनेपासून ची पहिली मोठी पिछेहाट आहे .कोणतेही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्था या भावी पिढी आणि पर्यायाने समाज निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. पुणे विद्यापीठात मागील वर्षी काही अशैक्षणिक गोष्टी घडल्या त्या या क्रमवारीची घसरण घडण्यास कारणीभूत आहेत ,अशी चर्चा आहे .                              

  कुलगुरू व विद्यापीठाबद्दल गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लेख प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाची दहा पुस्तके प्रकाशित करणाऱ्या कुलगुरूंनी शिष्टाचारास तिलांजली दिली .वास्तविक प्राध्यापक, संशोधक ,अधिकारी-कर्मचारी यांना पुस्तके, संशोधनात्मक लेख लिहिण्यास प्रोत्साहन देणे अपेक्षित. कोरोनाच्या महामारीच्या काळात स्वतःची तीस वर्षांपूर्वीची सेवा नियमित करून घेण्याचे प्रस्ताव ठेवणे किती नैतिक? कुलसचिव यांना दिलेल्या किंवा घेतलेल्या पगाराव्यतिरिक्त ज्यादा मानधन व भत्त्यांवर चौकशी समिती नेमणे हा एक वेगळा प्रकार .

कुलसचिवांनी विद्यापीठात फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींकडून प्रवेश शुल्क आकारण्याचे परिपत्रक काढणे व प्रसारमाध्यमांनी आक्षेप घेतल्यानंतर मंत्र्यांनी असे प्रवेश शुल्क रद्द करणे ,यावरून विद्यापीठ व्यवसाय केंद्र आहे का ?असा प्रश्न उपस्थित होतो. असे निर्णय व्यवस्थापन परिषद किंवा अधिसभेमार्फत का घेतले जात नाहीत? आणखी एक वेगळा प्रकार पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अपात्र ठरविलेले असतानाही त्यांना क्षमापित करून प्रशासन चालविण्यास सांगितले तर विद्यापीठाची प्रगती होईल की अधोगती? याचा विचार व्हावा .विद्यार्थी ,पालक, कर्मचारी ,प्राध्यापक यांच्या विद्यापीठा विषयीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोरोना कालावधीत माननीय शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठात येऊन प्रत्येकाचे गार्हाणे ऐकले. मंत्रीमहोदयांनी याबाबत लक्ष घातले. विद्यापीठ प्रशासनाचे हे अपयश म्हणावे का..? १९४८ ते २०२० या कालावधीतील ही पहिलीच घटना होती .अशा बऱ्याच बाबी आहेत . सध्याच्या कुलगुरूंचा कार्यकाल काही महिन्यांचाच शिल्लक आहे .त्यानंतर पुढील वर्षी २०२२ मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन समिती , बेंगलोर विद्यापीठास भेट देईल. तेव्हा नवीन नियुक्ती होणाऱ्या कुलगुरूं पुढे नवीन आव्हाने असतील. वर्ष २०१६मध्ये भेट दिलेल्या राष्ट्रीय मूल्यांकन समितीने सामाजिक गुणवत्ता (सोशल पॉईंट) वाढविण्याचे निर्देश विद्यापीठास दिले होते.

जागतिक क्रमवारीचा निकाल २ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर झाला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेल्या वर्षीचा मूल्यांकनाचा क्रमांक अद्यापही आहे. यामुळे विद्यार्थी, पालक यांचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होऊ नये म्हणून बहुधा दखल घेतलेली दिसते.

Post a Comment

Previous Post Next Post