शिरुर कसाई मोहल्ला ऐतिहासिक कब्रस्तानाला सीमाभिंत करून त्याचे जतन व संवर्धन या मागणीला नगरपरिषदेच्या वतीने मंजुरी




प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे  : नोव्हेंबर  शिरूर शहरातील कसाई मोहल्ला येथील ऐतिहासिक कब्रस्तानाच्या सिमा भिंतीच्या कामा साठी नगरपरिषदेच्या वतीने भूमि पूजन;फिरोज भाई सय्यद अध्यक्ष (बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका ) यांच्या प्रयत्नांना यश* 

फिरोज भाई सय्यद अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका यांनी सतत पाठपुराव्याला  आखेर यश प्राप्त झाले आहे.शिरूर नगरपरिषद हद्दीतील कसाई मोहल्ला येथील ऐतिहासिक कब्रस्तानाला कंपाऊंड वॉल करून त्याचे जतन व संवर्धन करावे या मागणीला नगरपरिषदेच्या वतीने मंजुरी  देऊन  तडकाफडकी काम सुरू करण्यात आले आहे.

सदरील कामाची पायाभरणी काल दि. १८ नोव्हेंबर रोजी मा. हजरत मौलाना फय्याज रज़वी साहेब यांचे हस्ते करण्यात आले तसेच शिरूर चे प्रसिद्ध सर्जन मा. डॉ. मगन ससाणे सर यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या, मुस्लिम जमात चे युनूस भाई सय्यद तसेच स्थानिक नागरिक मा. नादीर भाई शहा, बाबा भाई शेख, पीर मोहम्मद सय्यद, शाबान भाई शहा आदि यावेळी उपस्थित होते.


अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगरपरिषदेने मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे. परंतु प्रभाग क्रमांक दोन मधिल नदीच्या काठावर पाच एकर जागा आरक्षण क्र. २१ उद्यानासाठी राखीव आहे, ते विकसित करून घेण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी सर्व शक्तीनिशी पाठपुरावा करणार आहे.समाधान लोंढे शहराध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी शिरूर यांनी आभार मानले.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क; अन्वरअली शेख 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post