कोल्हापूर विधानपरिषदेत भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्‍चित ..चंद्रकांतदादा पाटील.





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इचलकरंजी/प्रतिनिधी -

विधानपरिषद निवडणुकीत विजय साध्य करण्याइतकी मते भाजपाच्या पाठीशी असून ते निकालातून स्पष्ट होईलच, असे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर विधानपरिषदेत भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्‍चित असल्याचा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ,आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज इचलकरंजी दौ-यात व्यक्त केला.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ,आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज        शुक्रवार पासून संपर्क दौरा सुरु केला आहे.  इचलकरंजी येथे ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीमध्ये इचलकरंजी, हुपरी, हातकणंगले नगरपरिषदेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक झाली. तर उल्हास सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणर यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आमदार सतेज पाटील यांनी मेळाव्यामध्ये 417 मतदारांपैकी तब्बल 280 मतदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला आहे, त्याकडे लक्ष वेधले असता आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी, वास्तविक सतेज पाटील यांना आपल्याला 415 सदस्यांचा पाठींबा असल्याचे म्हणायचे असेल, अशा शब्दात खिल्ली उडविली. महाविकास आघाडीचा दावा आकडेवारीवर टिकणारा नाही. काँग्रेसचे जिल्ह्यात चिन्हावर निवडून आलेले 36, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून 118 सदस्य आहेत. तर केवळ भाजपाचे 105 सदस्य असून प्रकाश आवाडे, विनय कोरे या आमदारांसह सहयोगी सदस्यांची मिळून 165 मते आहेत. त्यामुळे खोटे आणि फुगीर आकडे सांगून विजय मिळत नाही, ती संपर्कावर मिळत असतात. भाजपाला विजयासाठी आणखीन 43 मतांची गरज असून त्याची जुळणी केली असल्याचा दावाही त्यांनी केला. 

यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, स्वप्निल आवाडे, हुपरीचे उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे, नगरसेवक सुरज बेडगे, पृथ्वीराज यादव आदी उपस्थित होते.

त्यानंतर वखारभाग परिसरातील उल्हास सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी भाजपा नगरसेवक-नगरसेविकांची बैठक पार पडली. त्यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य एकजुट असून या निवडणूकीत अमल महाडिक यांचा विजय निश्‍चित असल्याचे सांगितले. या बैठकीत माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडीक, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजपा शहराध्यक्ष अ‍ॅड. अनिल डाळ्या यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post