विशेष वृत्त : डॉ . तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

माझ्यासारख्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यास( क्लार्क) हा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कारच आहे"..

डॉ.तुषार निकाळजे..

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

  ईएसएन पब्लिकेशन्स प्रशांत हॉस्पिटल विजयवाडा, अध्यापना आणि लर्न विथ लॉजिक या तामिळनाडू येथील संस्थांनी डॉ.तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे .

डॉ.तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे वरिष्ठ सहाय्यक( क्लार्क) पदावर गेली तीस वर्षे काम करीत आहेत. त्यांनी कार्यालयीन काम करीत असतानाच एम. फिल .पीएच.डी .(राज्यशास्त्र) शिक्षण पूर्ण केले. डॉ.निकाळजे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी दहा पुस्तके लिहून प्रकाशित केली.त्यामधील "भारतीय निवडणूक प्रणाली ,स्थित्यंतरे व आव्हाने" हे पुस्तक तीन विद्यापीठांच्या बी .ए ,एम ए.(राज्यशास्त्र) विषयाच्या अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून निवड झालेले आहे. एका राष्ट्रीय व एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत संशोधन प्रबंध सादर केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग ,नवी दिल्ली मान्यताप्राप्त रिसर्च जर्नलमध्ये नऊ लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच दैनिक, साप्ताहिक यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चोवीस लेख प्रकाशित झाले आहेत .इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये "स्पर्धात्मक कौशल्य असलेला शिक्षकेतर कर्मचारी "अशी नोंद झाली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी , लंडन यांनी डॉ. निकाळजे यांना " मानद डॉक्टरेट "पदवी देऊन सन्मानित केले आहे .वर्ल्ड बुक टॅलेंट रेकॉर्ड यांनी "ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड "ने सन्मानित केले आहे "महाराष्ट्र निवडणूक आयोगाने वर्ष २०१९  मध्ये" निष्णात व्यक्ती "म्हणून निवड केली आहे .

डॉ. निकाळजे यांनी विद्यापीठांच्या विभागनिहाय कामकाजाची माहिती देणारे पुस्तक मराठी, हिंदी ,इंग्रजी, उर्दू, ब्रेल- इंग्रजी या चार भाषांमध्ये प्रकाशित केले आहे. ही सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक कामे डॉ.निकाळजे यांनी स्वखर्चाने केली आहेत .डॉ.तुषार निकाळजे यांच्या या सर्व शैक्षणिक , संशोधनात्मक ,सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.

   तामिळनाडू येथे होणाऱ्या ग्लोबल आयकॉनिक एज्युकेशन अँवाँर्ड २०२१ या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक व संशोधनात्मक कामाबद्दल जीवनगौरव पुरस्कार जाहीर केल्याने डॉ. निकाळजे यांनी समाधान व्यक्त केले .डॉ. तुषार निकाळजे म्हणाले," माझ्यासारख्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यास( क्लार्क) हा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कारच आहे"

Post a Comment

Previous Post Next Post