लक्ष्मी पूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊ या

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

यंदा दिवाळी  (2021) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन 2021)  एकाच दिवशी ४ नोव्हेंबरला आहे.लक्ष्मी पूजनासाठी संध्याकाळी ५.१० ते रात्री ९ पर्यंत शुभ वेळ आहे. लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी आहेत. मात्र आज आपण लक्ष्मी पूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊयात.लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी. तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत.

एका चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घेऊन त्यात जरा गंगा जल मिसळून ८० टक्के पाण्याने भरुन घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्याभोवती सजवावे. कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधी नाणी ठेवा. 







आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. मात्र पुस्तकाचे कव्हर चामड्याचे नसावं. आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप लावा. उदबत्ती वापरु नये कारण उदबत्तीची बांबूची असल्याने पूजेत वापरु नये. पूजा स्थळी केरसुणीची पूजा करावी.

हातात फुलाच्या पाखळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ऊँ महालक्ष्मयै नम: जप करु शकता. षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे.देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरती नंतर देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी.

ही काळजी घ्या

      • या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरु ठेवावे.

      • श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे.

      • ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांच्या व्यवहार करु नये.

      • यारात्री अखंड ज्योत जळावी.

      • ( सुनिल पाटील पत्रकार )

Post a Comment

Previous Post Next Post