केंद्राने पेट्रोल डिझेलवर दर कमी केले आता राज्य शासन दर कपात करणार....?

 जीएसटीचे पैसे द्या निर्णय घेऊ’एवढ्या ५ शब्दात पवारांनी दर कपातीचा निकाल लावला.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 पुणे केंद्र सरकारने दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना थोडा दिलासा दिला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रत्येकी 5 रुपयांची कपात करुन महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या जनतेला काहीअंशी का होईना दिलासा मिळाला. केंद्राने पेट्रोल डिझेलवर अबकारी कर कमी केल्यानंतर आता राज्य शासन दरकपात करण्यासाठी काही पावलं उचलणार का?, असा सवाल महाराष्ट्रातील भाजप नेते विचारत होते. त्यांच्या प्रश्नाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

शरद पवारांनी ५ शब्दात निकाल लावला!

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली आहे. राज्य सरकार दरवाढ कमी करणार का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्याबाबत राज्य सरकारशी बोलावं लागेल. नागरिकांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. पण केंद्राकडे राज्याचं जीएसटीचं देणं आहे ते केंद्राने द्यावं. त्यामुळे लोकांना मदत करणारा निर्णय घेणं राज्य सरकारला शक्य होईल, असं पवार म्हणाले. म्हणजेच ‘जीएसटीचे पैसे द्या निर्णय घेऊ’ एवढ्या ५ शब्दात पवारांनी दर कपातीचा निकाल लावला.

Post a Comment

Previous Post Next Post