आता खाद्यतेलाच्या किमतीही कमी होणार.

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इंधन दरावरील उत्पादन शुल्क कमी करत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिवाळी भेट दिली होती. त्यातच आता आणखी एक दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून घरघुती तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आली आहे. किमतीं मध्ये होणारी ही वाढ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी क्रूड पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क 2.5% वरून शून्यावर आणला आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार कच्च्या पाम तेलासाठी असलेला कृषी उपकर 20% वरून 7.5% आणि कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलासाठी 5% वर आणल्याची माहिती वित्त मंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे. RBD पामोलिन ऑइल, रिफाइंड सोयाबीन आणि रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलवरील मूळ शुल्क देखील 32.5% वरून 17.5% पर्यंत कमी करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने करामध्ये कपात करण्यापूर्वी, सर्व प्रकारच्या कच्च्या खाद्य तेलांवर 20% कृषी पायाभूत सुविधा उपकर होता. कपात केल्यानंतर, क्रूड पाम तेलावरील प्रभावी शुल्क 8.25% असेल, कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेल प्रत्येकी 5.5% असेल. दरम्यान, 14 राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने इंधन उत्पादन शुल्काल कपात केल्याचा विरोधकांकडून केला जात होता. त्यानंतर आता खाद्यतेलाच्या दरांमध्येही कपात करण्यात आल्याने, केंद्र सरकार सर्व सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post