विशेष वृत्त : कलियुगातील विद्यापीठाने केले नैतिकतेचे वस्त्रहरण


 प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पूणे : एका विद्यापीठाचे वेबसाईट पाहताना करंट न्यूज मध्ये त्यांच्या वर्धापन दिनाची बातमी वाचली.दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो.यावर्षीच्या वर्धापन दिनासाठी काही सूचना व जाहिराती दिल्या आहेत.दरवर्षी असे वर्धापन दिन थाटामाटात साजरे होत असतात.या वर्धापन दिनानिमित्त जीवन गौरव, आदर्श प्राध्यापक ,प्राचार्य  कर्मचारी ,अधिकारी असे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात.हे पुरस्कार काही दानशूर व्यक्ती जाहीर करीत असतात .

या पुरस्कारांना अर्ज करताना काही नियम व अटी जाहीर केल्या जातात.यांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या एका पुरस्कारातील अटी,"कर्मचाऱ्यावर चौकशी समिती चालू नसावी, सेवाकाळात कोणतेही आरोप केलेले नसावे ,कोणतीही कारवाई चालू नसावी, कोणताही नैतिक अधःपतनचा गुन्हा चालू नसावा, "अशा प्रकारची आहे. यातील एक पुरस्कार विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने स्वखर्चाने चालू केला आहे .तसेच हा पुरस्कार स्वतःच्या नावे सुरू केला आहे. स्वतःला दानशूर समजणाऱ्या या अधिकार्‍यांची माहिती पुढीलप्रमाणे :- सदर अधिकाऱ्याने डॉक्टरेट दर्जाच्या दोन पदव्या घेतल्या आहेत. या दानशूर देणगीदार अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयात फौजदारी याचिका चालू आहे. काही वर्षांपूर्वी या अधिका-यावर एक चौकशी समिती देखील नेमली गेली होती. त्यावेळी यास सक्तीच्या रजेवर पाठवून दुसऱ्या विभागात बदली देखील केली होती. काही काळाने या अधिकाऱ्यास आदर्श अधिकारी पुरस्कार देखील दिला गेला होता .

आज या अधिकाऱ्याने जाहीर केलेला पुरस्कार किती नैतिक-अनैतिक ? याची चर्चा विद्यापीठ क्षेत्रात चालू आहे. विद्यापीठातील विद्वान मंडळी नैतिक मूल्य, सामाजिक जबाबदारी अशा प्रकारचे विषय शिकवतात ,आता कुठे गेली नैतिकता?  पुरस्कार नियमावली तयार करणारे तज्ञ काय करतात ?अपात्र आणि क्षमापीत अधिकारी व निव्वळ पगार घेणारे कायदे अधिकारी जोपर्यंत विद्यापीठातील प्रशासन चालवत असतील ,तर मग या नैतिकतेचे काय होणार?

 या पुरस्कारासाठी काही कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे टाळले असे समजते .कारण या पुरस्कारास अर्ज केल्यास आपली नैतिकता जगाला दिसेल .अशी भीती त्यांना वाटते. हे सर्व काही असले तरी कलियुगातील विद्यापीठाने नैतिकतेचे असे वस्त्रंहरण  करण्याची अपेक्षा नाही.,जरी जागतिक मानांकन १००  क्रमांकाने खाली गेले असले तरी देखील .परंतु या पुरस्काराचं पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी किमान नाव तरी बदलावे अशी अपेक्षा कर्मचारी करीत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post