खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे




प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :


 साल २०१६ मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन समिती (नँक ),बेंगलोर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मूल्यांकनाच्या सर्वेक्षणासाठी भेट दिली होती. त्यावेळी पंधरा ते वीस नवीन दूरचित्रवाणी संच खरेदी केले व विद्यापीठातील निर्रनिराळ्या विभागांमध्ये बसविले .त्यावेळी या दूरचित्रवाणी संचावर विद्यापीठाची शिक्षण ,संशोधन, प्रशासकीय कामकाज ,महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, प्रकल्प ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करार यांची माहिती दाखवली जात होती .तसेच एक अत्याधुनिक प्रिंटर  खरेदी केला। हा प्रिंटर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आहे. विद्यार्थ्यांनी कॉइन बॉक्स किंवा पेटीएम, गुगल पे द्वारे पैसे भरून प्रिंटिंग व झेरॉक्स करून घेऊ शकतात .हे सर्व राष्ट्रीय मूल्यांकन समितीला त्यावेळी दाखविले व मूल्यांकन मिळविले. यावर लाखो रुपये खर्च केला. परंतु तद्नंतर नीट पाहिले तर दूरचित्रवाणी संचाचे कनेक्शन नाही. प्रिंटर धूळ खात पडलेला ,असे दिसेल. प्रिंटरच्या काचेवरील चार बोटांच्या लाईन पहा, तद्नंतर वर्ष२०१७  मध्ये परीक्षा विभाग येथून स्थलांतरित केला. परंतु वर्ष २०१७  ते आज पर्यंत हा विद्यार्थी उपयुक्त प्रिंटर परीक्षा विभागाजवळ स्थलांतरित केला नसल्याने विद्यार्थ्यांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जाऊन झेराँक्स, प्रिंटिंग करून आणावे लागते .परीक्षा विभागात रोज शेकडो विद्यार्थी भेट देत असतात .आजपर्यंत या प्रिंटरच्या खरेदीचे पैसे वसूल झाले असते .या प्रिंटरचे ऑडिट केल्यास किती पैसे जमा झाले? हे समजेल.  हा विद्यार्थी उपयोगी प्रिंटर परीक्षा विभागाजवळ आवश्यकता असून लावला नाही. परंतु परीक्षा विभागाच्या गेटजवळ चित्रपटाच्या शूटिंगचे सेट मात्र त्वरित लावले गेले.

                                स्टुडिओ


सध्या हा प्रिंटर प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर आहे. येथून रोज कुलसचिव ,प्र-कुलगुरू ,प्रशासकीय अधिकारी, दोन कायदा अधिकारी, वित्त अधिकारी यांचे जाणे-येणे चालू असते. कारण त्यांची कार्यालय याच इमारतीत आहेत. तरीदेखील हे कोणाच्या दृष्टीस अद्यापर्यंत का आले नाही? 

             सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाचा हा कारभार म्हणजे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे असा आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो

Post a Comment

Previous Post Next Post