पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा १९ नोव्हेंबर शुक्रवारी होणार

 


प्रेस मीडिया वृत्तसेकारणवा : अनवरअली शेख :

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी १९ नोव्हेंबरला पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांत लेखी परीक्षा होणार आहे . पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा शुक्रवारी दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणार आहे. सहा जिल्ह्यांतील ४४४ परीक्षा केंद्रांवर एक लाख ९० हजार ३१९ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पहिला टप्पा लेखी परीक्षेचा असणार आहे. अर्ज केलेल्यांपैकी पात्र ठरलेले एक लाख ९० हजार ३९० उमेदवार ही लेखी परीक्षा देणार आहेत.

परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक आहे.

*जिल्ह्यातील केंद्र व परीक्षार्थी,*

*पुणे जिल्ह्यात २१७ केंद्रांवर एक लाख ८५६ परीक्षार्थी,*

   *नाशिक जिल्ह्यात ३१ केंद्रांवर १३हजार ८०० परीक्षार्थी,* 

    *सोलापूर जिल्ह्यात २५ केंद्रांवर ११ हजार ८७८ परीक्षार्थी,*

    *अहमदनगर जिल्ह्यात ४७ केंद्रांवर १७ हजार ६८ परीक्षार्थी,*

    *औरंगाबाद जिल्ह्यात ७७ केंद्रांवर २१ हजार ७३२ परीक्षार्थी,*

   *नागपूर जिल्ह्यात ४७ केंद्रांवर २४ हजार ९९४परीक्षार्थी*

 परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग होणार आहे. व भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक आहे. पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी व इतर तीन पोलीस अशा चार जणांचे हे पथक असेल. परीक्षा सुरू असताना हे पथक पाहणी करणार आहे. परीक्षेसाठी ११ हजार पोलिसांचा बंदोबस तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post