कुलभूषण जाधव यांना दाद मागता येणार पाकिस्तानी संसदेत विधेयक मंजूर

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी सुनील पाटील


हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात बंद असलेले कुलभूषण जाधव यांना आत्ता त्यांच्याविरोधातील निकालावर दात मागण्याचा अधिकार मिळाला आहे यासंदर्भात पाकिस्तानी संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या (ICJ) निर्णयानुसार हे विधेयक मंजूर झाले आहे.

भारतीय कैदी कुलभूषण जाधव यांना दाद मागण्याचा अधिकार देण्यासाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीने १० जूनला एक विधेयक स्वीकारले होते. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालानुसारच हे विधेयक आणण्यात आलं होतं. परिमाणकारक आढावा आणि पूनर्विचाराचा अधिकार मिळाला पाहिजे, असे आयसीजेने निर्देश दिले हेते.

कुलभूषण जाधव प्रकरणात आयसीजेने दिलेल्या निकालानुसार, २०२० मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान सरकारने एक अध्यादेश काढला होता. कुलभूषण जाधव हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली सन २०१७ मध्ये पाकिस्तानातील लष्करी न्यायालायने कुलभूषण जाधव यांना देहदंडाची शिक्षा ठोठावली होती.

जाधव यांना साधा वकिलही न देणाऱ्या आणि त्यांच्या मृत्यू दंडाच्या शिक्षेविरोधात भारताने थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली होती. शिक्षेचा पाकिस्तानने आढावा घेऊन फेरविचार करावा व भारतीय दूतावासाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची परवानगी द्यावी, असा निकाल आयसीजेने दिला होता.

Post a Comment

Previous Post Next Post