स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौंडेशनच्या माध्यमातून आदर्शवत समाज प्रबोधनाचे काम

गणेश बेकरीचे चेअरमन आण्णासाहेब चकोते यांचे प्रतिपादन.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

नांदणी/ प्रतिनिधी:

स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौंडेशनच्या माध्यमातून किल्ला स्पर्धेचे आयोजन करून छत्रपती शिवराय आणि महापुरुषांचे विचार युवा पिढीमध्ये रुजविण्याचे काम होत आहे. तरुण पिढीला  इतिहासाची ओळख करून देऊन आदर्शवत समाज प्रबोधनाचे काम फौंडेशन करीत आहे. आगामी काळात अशा सामाजिक कार्यात फौंडेशन सोबत चकोते समूहही पुढे राहील, असे प्रतिपादन गणेश बेकरीचे चेअरमन आण्णासाहेब चकोते यांनी केले.

स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नांदणी (ता. शिरोळ) येथे आयोजित किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

   दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी फौंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे, सुरेश गरड, प्रल्हाद आंबी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सुतार, शितल ऐनापुरे यांनी मनोगत व्यक्त करून फौंडेशनच्या कामाचे कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मंडळांना बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.

नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे, प्रगतशील शेतकरी रघुनाथ म्हेत्रे, मनोहर माळी, माजी उपसरपंच अजित पाटील, डॉ. सिद्राम कांबळे, पंचगंगेचे संचालक रावसाहेब भगाटे, राजू संभूशेटे, ग्रा. पं. सदस्य दिलीप परीट, विनायक कोळी, रमेश भुई, अनिल धुळासावंत, कुमार भगाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रा. पं. सदस्य शितल उपाध्ये, मांतेश जुगळे, अझरुद्दीन शेख, किरण वठारे तसेच सा. रे. पाटील फौंडेशनचे कार्यकर्ते  संजय मगदूम, सौरभ चौगुले, निखिल भगाटे, पंकज सूर्यवंशी, विनायक परीट, विनायक चौगुले, सुनील बमनगे, सचिन चौगुले, उमेश कामत, अमोल तगारे, आशिष कुरणे व चावडी चौकातील कार्यकर्त्यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण संजय गुरव, शितल ऐनापुरे व संजय सुतार यांनी केले. प्रारंभी छ. शिवराय, पं. नेहरू, सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.  स्वागत जिल्हा परिषद विभाग प्रमुख महेश परीट यांनी केले. प्रास्ताविक ग्रा. पं. सदस्य दीपक कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गुरव यांनी केले.

  पुढील वर्षी फौंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या किल्ला स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम वाढवून प्रथम क्रमांक ११,००० रु.,द्वितीय ७,०००रु., तृतीय ५,००० रु. व चतुर्थसाठी ३,००० रु. करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच आण्णासाहेब चकोते यांनी प्रत्येक वर्षी किल्ला स्पर्धेत जी स्पर्धक मंडळे सहभागी होतील त्यांच्या प्रतिनिधी करीता किल्ला सहलीचे नियोजन करीत असल्याचे जाहीर केले. आभार शितल उपाध्ये यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post