विधान परिषदे निवडणुक : उमेदवार निश्चित होण्याअगोदरच मतदारांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन जोरदारपणे सुरू

 सहलीवर जाणार्‍या मतदारांना 'टोकन'ही देण्यास सुरुवात...

सतेज पाटील महाडिक यांची निवडणुकीतील रंगत चांगलीच रंगणार...


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक :

विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडणूक जाहीर होताच  उमेदवार निश्चित होण्याअगोदरच मतदारांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन जोरदारपणे सुरू झाले आहे. सहलीला पाठविण्यात येणार्‍या ठिकाणांचे अडवान्स बुकिंग करण्यात येऊ लागले आहे. ज्यांना महिनाभर वेळ आहे, त्या मतदारांच्या दारात आता पासूनच वाहने उभी राहू लागली आहेत. त्यासाठी 'टोकन'ही देण्यास सुरुवात झाली आहे


विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. दोन्हीकडून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. मतदार मर्यादित असल्यामुळे दिवाळी पासूनच मतदारांना आकर्षित करण्याचे जोरदारप्रयत्न सुरू झाले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने उमेदवारांकडून भेटवस्तू पोहोच करण्यात आल्या आहेत. निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात पुन्हा महाडिकच असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढणार अशी चर्चा चवीने सुरू आहे.

मर्यादित मतदारसंख्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात होत असते ,  त्या मुळे उमेदवारांकडून अतिशय सावधानता बाळगली जाते. आपला मतदार विरोधकांच्या संपर्कात येणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. या वेळी मतदारांना थेट  आता पासूनच सहलीचे नियोजन करण्यात येऊ लागले आहे

ज्यांच्या कडे वेळ आहे, ज्यांना महिनाभर सहलीवर जायचे आहे त्यांच्या साठी उमेदवारांच्या वतीने वाहने तयार ठेवली आहेत. या वाहनांमध्ये मतदार आता बसू लागले आहे. आतापासून सहलीवर जाणार्‍या मतदारांना 'टोकन'ही देण्यास सुरुवात केली आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे

सहलीची ठिकाणे निश्चित....

मतदानाला अद्याप जवळपास महिना आहे. गेल्यावेळी विधान परिषदेची कोल्हापुरातील निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली होती. यावेळची निवडणूक देखील त्याच दिशेने जाऊ लागली आहे. त्यामुळे कोणताही धोका होऊ नये म्हणून मतदारांना सहलीवर पाठविण्याची ठिकाणे निश्चित करण्यात येऊ लागली आहेत.

इचलकरंजी करांचा कल या वेळी काँग्रेस कडे असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post