अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोल्हापुरातील तीन कंपनीवर छापा टाकत भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र मिठाईची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोल्हापुरातील तीन कंपनीवर छापा टाकत भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले आहेत.कोल्हापुरातील शिरोळ इथल्या शिवरत्न मिल्क अॅण्ड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट, अमवा मिल्क अॅण्ड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट, गणेश मिल्क प्रॉडक्ट या आस्थापनांवर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ऐन दिवाळीत या ठिकाणी भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याचं निदर्शनास आलंय.

कोल्हापूरच्या शिरोळमधील शिवरत्न मिल्क कंपनीवर धाड टाकण्यात आली. यावेळी दूध पावडर  आणि दह्यातील पाणी पावडर चा अपमिश्रक म्हणून वापर करून खव्याची उत्पादन, विक्री होत असल्याचे आढळले. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत 499 किलो भेसळयुक्त खवा आणि एकूण ११ लाख 37 हजार 458 रुपयांचा साठा जप्त केलाय.

तर कोल्हापूरच्या शिरोळमधील अमवा मिल्क कंपनीवर धाड टाकली असता तेथे खव्या उत्पादनासाठी स्किम्ड दूध पावडर , तेल, दह्यातील पाणी पावडर चा अपमिश्रक म्हणून वापर करत असल्याचे आढळले. अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाईत या कंपनीतून 498 किलो भेसळयुक्त खवा जप्त आणि एकूण 3 लाख 70 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील गणेश मिल्क प्रॉडक्टवर देखील अन्न आणि औषध प्रशासनाकडून धाड टाकण्यात आली. यावेळी 431 किलो भेसळयुक्त खवा जप्त आणि 2 लाख 90 हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कंपनीत देखील स्किम्ड दूध पावडर  आणि दह्यातील पाणी पावडर  चा अपमिश्रक म्हणून वापर करत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनच्या निदर्शनास आले

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईला मागणी असते, परंतु त्यात निकृष्ट दर्जाचा खवा वापरुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post