इचलकरंजीत काँग्रेसची कंगना - विक्रम गोखलेंचा निषेध नोंदवत निदर्शने

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील काँम्रेड के.एल.मलाबादे चौकात आज मंगळवारीअभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तसेच कंगनाला समर्थन देणार्‍या अभिनेते विक्रम गोखले यांचा जोरदार निषेध नोंदविण्यात आला. तसेच राणावत व गोखले यांच्या फलकावर शाई फेकत निदर्शने करण्यात आली. तसेच तमाम भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा यांचा अपमान करणार्‍या कंगनाला दिलेला पद्मश्री सन्मान केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करून तिला अटक करावी, अशी मागणी केली.त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताच्या स्वातंत्र्यावरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कंगनाचा विविध आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदविला जात आहे. इचलकरंजी शहरातही आज मंगळवारी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने कॉम्रेड के.एल.मलाबादे चौकात कंगना राणावत व तिचे समर्थन करणार्‍या विक्रम गोखले यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी कंगना व गोखले यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडत कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी कंगना व गोखले यांच्या प्रतिमा असलेल्या डिजिटल फलकावर शाई ओतून निषेध नोंदविला. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे

अध्यक्ष नगरसेवक राहुल खंजिरे यांनी, कंगनाने वादग्रस्त वक्तव्य करुन समस्त भारतीयांचा अपमान केला आहे. तिला देण्यात आलेला पद्मश्री सन्मान परत घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला अटक करावी, अशी मागणी केली.

या आंदोलनात राजन मुठाणे, शशिकांत देसाई, रियाज चिकोडे, उदय गीते, शौकत मुल्ला, युवराज शिंगाडे, समीर शिरगांवे, सुमित बाबर, संग्राम घुले, सचिन साठे, रियाज जमादार, अजित मिणेकर, प्रविण फगरे, ताजुद्दीन खतीब, नामदेव कोरवी, रवि वासुदेव, संजय शिंगाडे, दिलीप भोई, अशोक नाडे, राजू किणेकर, वेदिका कळंत्रे, अनिता गायकवाड, सावित्री हजारे, प्रमोद नेजे, सचिन साठे, नंदकिशोर जोशी, नासिर गवंडी, हारुण खलिफा, मारुती कोरवी, जीवन पोतदार, परशराम सपाटे, संतोष माने, सुदाम साळुंखे, विशाल लायकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post