आमदार श्री मनोहर शेठ भोईर सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मास्क वाटप.



    प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनील पाटील.

रसायनी : कोरोना काळात गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उध्दव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर 2021 रोजी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले, त्या बरोबर माझे विद्यार्थी माजी जबाबदारी ही संकल्पना सुध्दा मांडली. या त्यांच्या संकल्पनेचा आदर करत आमदार श्री मनोहरशेठ भोईर सामाजिक  संस्था, नवीन शेवा यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय व आर्ट अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, नवीन शेवा मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क देण्यात आले. सदर मास्क शिवसेना जिल्हाप्रमुख  मा आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष म्हात्रे सर  यांच्याकडे सोपविण्यात आले.

या वेळी शिवसेनेचे उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, आमदार श्री मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री दिनेश घरत, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ नवीन शेवाचे अध्यक्ष श्री पंकज  सुतार व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post