मदद फाउंडेशन देहूरोड तर्फे गोर गरीबांना अन्न वाटप करून पैगंबर जयंती साजरी



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

देहूरोड  : पुणे :

आज  ईद - ए - मिलाद अर्थात पैगंबर मुहम्मद साहेबांची जयंती मदद फाउंडेशन देहूरोड तर्फे गोर गरीबांना अन्न वाटप करून पैगंबर जयंती साजरी करण्यात आली, मदद फाउंडेशन नेहमीच गरिबांना लाभ होईल अशी उपक्रमे राबविण्याचे प्रयत्न करत असते,कोरोना काळात देहूरोड शहरात मोलाचा वाटा उचलला  होता,मदद फाउंडेशन देहूरोड च्या पदाधिकारी यांना  ईद - ए - मिलाद बद्दल विचारले असता त्यांनी सविस्तरपणे अशी माहिती दिली

  ईद - ए - मिलाद म्हणजे ' अल्लाह ' चे प्रेषित हजरत मुहंमद पैगंबरयांचा जन्मदिवस . जगभर ईद - ए - मिलादुन्नबी ' हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीऊल अव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो . मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुहा . ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते . आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे .

आणि  या उलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते . इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म इ.स. ५७१ मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला . जन्मा अगोदरच महंमद पैगंबर यांचे पितृछत्र हरपले होते . वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रीना पण देवाज्ञा झाली . लहानपणीच माता - पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्यांच्या चुलत्याने संगोपन केले .

लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक इस्लाम धर्माचा संस्थापक बनला . आपल्या जीवनकाळात हजरत मुहम्मद पैगंबर, यांनी समस्त मानवजातीला उदारता , समता , विश्वबंधुत्व , सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली . त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादित नव्हती , तर " संपूर्ण मानव " जातीच्या कल्याणासाठी होती,

 या ठिकाणी मदद फाउंडेशन देहूरोड चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post