माथेरानचे माथेरानपण जतन करीत जगप्रसिद्ध करायचे आहे.....आदित्य ठाकरे





 प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील :

                 माथेरानची लाल माती आणि जांभा दगडाचे रस्ते यातून शाश्वत विकास करायचा असून त्यातून माथेरानचे माथेरानपण जतन करायचे आहे असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. माथेरान मधील शाश्वत विकास करताना रोजगार निर्मिती करायची आहे,त्यात माथेरान मधील हॉस्पिटल नजीकच्या काळात सक्षम करता येईल असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

                       माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उदघाटन सोहळा आज 24 ऑक्टोबर रोजी माथेरान येथे पार पडला.राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे पर्यटन विभागाचे मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार अदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले.त्यात माथेरान मधील 100 वर्षे जुन्या असलेल्या करसनदास मूळजी वाचनालयाचे तसेच पालिकेच्या सभागृहाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह असे देण्यात आले असून त्या सभागृहाचे नामकरण आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर येथील हॉटेल उषा एस्कॉट च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात माथेरान मधील नऊ विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने झाले.

आज लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलेल्या त्या विकास कामांमध्ये ओलम्पिया ग्राउंडचा पुनर्विकास करणे,माथेरान शहरातील मुख्य रस्ता ते लॉर्ड पॉईंट रस्ता विकसित करणे,मुख्य रस्ता ते बिग चौक पाइंट रास्ता विकसित करणे,प्रीती हॉटेल ते पॅनोरमा हॉटेल रस्ता विकसित करणे आणि क्ले पेव्हर ब्लॉक लावणे,स्लाटर   हाऊसचे नूतनीकरण करणे,पंचधील नगर येथील शौचालाय नूतनीकरण करणे,मुख्य रस्ता ते मंकी पॉईंट हा रस्ता विकसित करणे,मुख्य रस्ता ते कोरोनेशन पॉईंट रस्ता विकसित करणे तसेच माथेरान नगरपरिषद हद्दीत बसविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण डस्टबिन चे लोकार्पण झाले.त्यावेळी मंत्री महोदय यांच्यासह मुंबई सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि माथेरान नगरपरिषदचे पर्यटन दूत अभिनेते आदेश बांदेकर,मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर,मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे,कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे,रायगड चे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्यासह माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत,उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख  मनोहर भोईर,शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष सावंत आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचे हस्ते झाले.

                 विकास कामांची भूमिपूजने आणि लोकार्पण झाल्यानंतर राज्याचे पर्यटन,पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्याला स्वतः यायचे आहे म्हणून ऑनलाईन कार्यक्रम नको असे स्पष्ट केले.यापुढे माथेरानला येताना दोन दिवस राहायला येणार आहोत असे सांगून माथेरान जतन करण्याची गरज आहे.आपली लाल माती आणि जांभा दगडाचे रस्ते पाहून आनन्द वाटला असून राज्य सरकार माथेरान पुनर्जीवित करून माथेरान जगप्रसिद्ध करायचे आहे असे स्पष्ठ केले.माथेरान बद्दल कोणाला काही सांगायची गरज नाही अशी माथेरानचे स्वतःची ओळख आहे.त्यासाठी माथेरानसाठी जी जी कामे होत आहेत आणि करावी लागणार आहेत हे पाहण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम आवर्जून रद्द केला असल्याचे नमूद केले. आपल्याला या ठिकाणी येताना अनेक निवेदने दिली जात होती,त्यात हॉस्पिटलचा प्रश्न मांडला जात होता,त्यामुले महाबळेश्वरच्या धर्यीवर माथेरान माथेरान मधील हॉस्पिटल सुधारण्याचे काम काही महिन्यात करायचे आहे असे जाहीर केले. त्यासाठी सीएसआर फंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि महाबळेश्वर मधील हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल उभारले जाईल असे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.कोरोना काळात माथेरान जागतिक स्तरावर गेले आहे,त्यामुळे माथेरानची स्वतःची ओळख निर्माण झाली आहे ती पुसली जाऊ नये यासाठी पर्यावरण पूरक विकास करण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे ठाकरे यांनी स्पस्ट केले. 

माथेरान मध्ये विकास होत असताना तो विकास शाश्वत असला पाहिजे आणि त्या विकास करताना स्थानिकांना बरोबर घेऊन करायचे आहे.स्थानिकांना रोजगार करणारा हा शाश्वत विकास माथेरान मध्ये केला जाणार असून त्यातून रोजगार निर्मिती करण्यावर राज्य सरकार भर देणार आहोत.माथेरान पालिकेने उभारलेले सभागृह बघून मला देशातील सर्वात सुंदर सभागृह वाटत असून हे सभागृह प्रमाणे माथेरान हे सुंदर बनवायचे आहे आणि त्यासाठी आपली सर्वांची भूमिका असणार आहे असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. माथेरान मध्ये पर्यटन दूत बनवलेले आदेश बांदेकर यांनी माथेरान चा विकास मनावर घेतला आहे,कारण आठवड्यातील एक दिवस माथेरानचे प्रश्न मांडत असतात.त्यामुळे ते माथेरानचे मुंबई मध्ये दूत असल्याची सातत्याने जाणीव होत असते.तर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर असल्या तरी मुंबई बरोबर माथेरान चे प्रश्न आणत असतात.

                     रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना माथेरान मध्ये पर्यटक अधिक संख्येने यावेत यासाठी पर्यटन विभागाने अनेक प्रकल्प आणण्याची गरज होती आणि त्यासाठी पर्यटन विभागाबरोबर नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएकडून अधिक निधी मिळावा अशी मागणी केली.तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या विभागाच्या एमटीडीसी च्या रिसॉर्टला गतवैभव देण्याचे त्यांचे प्रयत्न हे राज्याला या पूर्वी लाभलेल्या अन्य पर्यटन मंत्र्यांच्या पुढील काम आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू झाले आहे हे महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाला माईल स्टोन ठरत असल्याचे यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माथेरान गिरीस्थान नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी यावेळी माथेरानचा विकास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने होऊ शकला आहे.माथेरान मधील सिम्पसन टॅंकला पुन्हा जिवंत करण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देण्याची विनंती केली.जिल्हा प्रशासनाने बनवलेल्या भीतीपत्रके यांचे प्रकाशन मंत्री महोदय यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हार पवार आणि आभार पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post