कोरोना काळात मनोबल ढासळत असताना मिळालेली शाब्बासकीची थाप लाख मोलाची - प्रसाद ओक


 दी एक्स्ट्रा माईल्स अवॉर्ड २०२१'चे दिमाखात सोहळ्यात वितरण..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : कोरोनामुळे गेल्या दीड -दोन वर्षात मलाही कोणत्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावता आलेली नाही.  सगळ्यांसाठीच ही नवीन सुरूवात आहे. कोरोनाच्या काळात लोक स्वतः वरचा विश्वास गामावत चालले आहेत. त्यांचे मनोबल ढासळत असताना पुरस्काराच्या रूपाने त्यांना मिळालेली शाब्बासकीची थाप ही लाख मोलाची आहे, असे मत अभिनेते प्रसाद ओक यांनी व्यक्त केले.

'दी एक्स्ट्रा माईल्स अवॉर्ड २०२१'चे वितरण नुकतेच प्रसाद ओक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून   मंजिरी ओक,  बीग बॉस सीजन १२ मधील बॉलीवूड सेलेब्रिटी सौरभ पटेल, टीव्हीस्टार अनुष्का श्रीवास्तवा, 'स्टार फेयर्स  इव्हेंट'च्या संस्थापक - संचालिका पल्लवी मोरे - माने,  शो डायरेक्टर अभिजीत मोरे आदी उपस्थित होते. लेमन ट्री प्रीमियर या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  ४० मान्यवरांना अवॉर्ड देऊन सन्मानित आले. ट्रॉफी, प्रशास्तीपत्रक आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रसाद ओक म्हणाले, कोरोनाच्या काळात अनेकांनी वाईट दिवस पाहिले आहेत. लोक स्वतःवरचा विश्वास गमावून बसले आहेत. अशा परिस्थितीत एक नवीन सुरूवात करताना पुरस्काराच्या रूपाने प्रोत्साहन मिळणे म्हणजे आत्मविश्वास परत मिळवून देण्या सारखे आहे. पल्लवी मोरे - माने  आणि टीमने संपूर्ण देशभरातून खूप वेगळी कार्यक्षमता असणारी माणस शोधून काढली व त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

स्टार फेयर्स  इव्हेंट'च्या संचालिका पल्लवी मोरे - माने म्हणाल्या, इतकी वर्ष काम करीत असताना अनेक कर्तुत्ववान लोकं माझ्या संपर्कात आली. मात्र करोंनाच्या काळात ही माणसं आपले वेगळेपण विसरत चाललेली होती. त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी होता जात असल्याने त्यांचे काम पुन्हा जागृत करण्यासाठी या पुरस्काराची सुरूवात झाली. त्यासाठी परीक्षकांचे पॅनेल तयार करण्यात आले होते, याच पॅनेलने ६०० हून लोकांमधून  या ४० पुरस्कारार्थीं ची निवड केली आहे. 

दरम्यान, या प्रसंगी स्टार फेयर्स  इव्हेंटच्या वतीने फॅशन शो देखील आयोजित करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post