महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त हा वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो.

अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल  येथे  वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.  तंजिमा शेख , मुख्याध्यापिका श्रीमती परवीन शेख ,रावसाहेब भागवत मिरगणे ,राज मुजावर , सौ. यमीन शेख , सौ. रईसा सुडके , इम्रान सर उपस्थित होते. शाळेत पुस्तकांचे ऑनलाईन प्रदर्शन भरवण्यात आले होते.  याची माहिती शाळेच्या ग्रंथपाल सौ. आस्मा शेख यांनी सर्वांना दिली. भाषण स्पर्धेतील प्रथम कमांक विजेती कु. सानिया इम्रान शेख यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सर यांचा जीवन परिचय करून दिला. 

 एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च मध्ये राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.  'हॉस्पिटॅलिटी व टुरिझम इंडस्ट्री' मधील यशस्वी मान्यवरांचे जीवनचरित्र तसेच आत्मचरीत्र यांचे ऑनलाईन पद्धतीने वाचन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल सौ चंदा सुपेकर यांनी प्रा. इम्रान सय्यद यांच्या मदतीने केले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता फ्रान्झ यांचे मार्गदर्शन लाभले.

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे ई -क्विझ स्पर्धा घेण्यात आली. १३८ जणांनी सहभाग घेतल्याची माहिती नूरजहाँ शेख यांनी दिली. प्राचार्य डॉ. शैला बूटवाला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केल

Post a Comment

Previous Post Next Post